जम्मूमधील पाच जिल्ह्यांतील इंटरनेट सेवा पुन्हा बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2019 02:44 PM2019-08-18T14:44:37+5:302019-08-18T14:45:16+5:30
कलम 370 आणि कलम 35 अ बाबत केंद्र सरकारने निर्णय जाहीर करण्यापूर्वी एक दिवस आधी खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण जम्मू काश्मीरमधील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती.
जम्मू : जम्मूमध्ये पसरवण्यात येत असलेल्या अफवांच्या पार्श्वभूमीवर जम्मूमधील पाच जिल्ह्यातील इंटरनेट सेवा पुन्हा बंद करण्यात आली आहे. एका दिवसापूर्वीच जम्मूमधील इंटरनेट सेवा कमी गतीने सुरू करण्यात आली होती. मात्र आता अफवांना रोखून शांतता कायम राखण्यासाठी इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
कलम 370 आणि कलम 35 अ बाबत केंद्र सरकारने निर्णय जाहीर करण्यापूर्वी एक दिवस आधी खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण जम्मू काश्मीरमधील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. तसेच राज्यातील बहुतांश भागात संचारबंदी लागू करण्यात आली होती. मात्र काही दिवसांनंतर हळूहळू निर्बंध हटवण्यात आले होते. तसेच या शुक्रवारी आणि शनिवारी रात्री जम्मू, सांबा, कठुआ, उधमपूर आणि रियासी या जिल्ह्यातील इंटरनेट सेवा संथगतीने सुरू करण्यात आली होती.
मात्र जम्मूमध्ये पसरवत येण्यात असलेल्या अफवांच्या पार्श्वभूमीवर आज दुपारी पाच जिल्ह्यातील इंटरनेट सेवा तातडीने बंद करण्याचा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला