Jammu And Kashmir : तब्बल 5 महिन्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये प्रीपेड आणि पोस्टपेड '2-जी' इंटरनेट सेवा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2020 09:59 AM2020-01-25T09:59:52+5:302020-01-25T10:07:12+5:30

जम्मू-काश्मीरमध्ये तब्बल पाच महिन्यांनंतर पोस्टपेड सोबत प्रीपेड इंटरनेट सेवा सुरू करण्यात आली आहे.

internet services will be resumed in jammu and kashmir from saturday | Jammu And Kashmir : तब्बल 5 महिन्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये प्रीपेड आणि पोस्टपेड '2-जी' इंटरनेट सेवा

Jammu And Kashmir : तब्बल 5 महिन्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये प्रीपेड आणि पोस्टपेड '2-जी' इंटरनेट सेवा

googlenewsNext
ठळक मुद्देजम्मू-काश्मीरमध्ये तब्बल पाच महिन्यांनंतर पोस्टपेड सोबत प्रीपेड इंटरनेट सेवा सुरू.20 जिल्ह्यांना 2 जी मोबाईल इंटरनेट सेवा बहाल करण्यात आली आहे.फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप सारख्या सोशल मीडियाचा वापर करता येणार नाही.

श्रीनगर - जम्मू-काश्मीरमध्ये तब्बल पाच महिन्यांनंतर शनिवारी (25 जानेवारी) पोस्टपेड सोबत प्रीपेड इंटरनेट सेवा सुरू करण्यात आली आहे. 20 जिल्ह्यांना 2 जी मोबाईल इंटरनेट सेवा बहाल करण्यात आली आहे. मात्र इंटरनेटच्या माध्यमातून 301 वेबसाईट लोकांना सर्च करणं शक्य होणार आहे. तसेच फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप सारख्या सोशल मीडियाचा वापर करता येणार नसल्याची माहिती मिळत आहे. 

जम्मू काश्मीरच्या गृहविभागाने दिलेल्या अधिसुचनेनुसार, मोबाईलवर 2 जी स्पीडसोबतच इंटरनेट सुविधा देण्यात आली आहे. तसेच काही वेबसाईट्चा वापर करता येणार आहे. यामध्ये बँकिंग, शिक्षण, बातम्या, प्रवास, रोजगार आणि अन्य काही गोष्टी या तेथील लोकांना सर्च करता येणार आहेत. पोस्टपेड आणि प्रीपेड कार्डवर डेटा सुविधा उपलब्ध होणार आहे. काही दिवसांपूर्वी जम्मू विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये ‘2-जी’ मोबाईल इंटरनेट सेवा बहाल करण्यात आली होती. मात्र ही सुविधा केवळ पोस्टपेड मोबाईलसाठीच उपलब्ध होती. तसेच हॉटेल, रुग्णालय, ट्रॅव्हल एजन्सीशी संबंधीत ब्रॉडबॅण्ड सेवा देखील सुरू करण्यात आली. मंगळवारी (14 जानेवारी) प्रशासनाने 15 जानेवारीपासून हे लागू करण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर ही सुविधा जम्मू, सांबा, उधमपूर, कठुआ, आणि रियासी या जिल्ह्यांमध्ये उपलब्ध आहे. 

जम्मू परिसरातील सांबा, कठुआ, उधमपूर आणि रियासीमध्ये ई-बँकींगसह सुरक्षित वेबसाईट पाहण्यासाठी पोस्टपेड मोबाईलवर 2जी मोबाईल इंटरनेटला परवानगी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य सरकारने कायदा सुव्यवस्था व सद्यस्थितीची पडताळणी करून जम्मू विभागात मोबाईल इंटरनेट सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सात दिवसांच्या पाहणीनंतर या सेवेचा कालावधी वाढवला जाऊ शकतो. 5 ऑगस्ट रोजी जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर काश्मीर खोऱ्यात लँडलाईन, इंटरनेट व एसएमएस सेवा बंद करण्यात आली होती. 

महत्त्वाच्या बातम्या

China Coronavirus : जगभरात अलर्ट! कोरोना व्हायरसमुळे 41 जणांनी गमावला जीव

'हिंदुत्व पेलणे हा येरागबाळ्यांचा खेळ नाही'; सामनातून 'मनसे'वर टीकास्त्र

शिवसेनेचे आदित्य विरुद्ध मनसेचे अमित; दोन युवा ठाकरेंच्या वाटचालीकडे लक्ष

कोरेगाव भीमा दंगलीचा तपास ‘एनआयए’कडे

बिहारप्रमाणे राज्यातही बोगस हॉस्पिटल; ना डॉक्टर ना पेशंट, बोटांचे ठसे बनवून डॉक्टरांची हजेरी

 

Web Title: internet services will be resumed in jammu and kashmir from saturday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.