भारतात बलूनद्वारे इंटरनेट
By admin | Published: November 4, 2015 02:09 AM2015-11-04T02:09:48+5:302015-11-04T02:09:48+5:30
जगातील दोन तृतीयांशापेक्षा जास्त लोकसंख्या इंटनेटपासून वंचित आहे. ग्रामीण आणि दुर्गम प्रदेशात आजही संगणक आणि इंटरनेट पोहोचलेले नाही. गुगलच्या लून प्रोजेक्ट या मोठ्या फुग्यांद्वारे
मुंबई : जगातील दोन तृतीयांशापेक्षा जास्त लोकसंख्या इंटनेटपासून वंचित आहे. ग्रामीण आणि दुर्गम प्रदेशात आजही संगणक आणि इंटरनेट पोहोचलेले नाही. गुगलच्या लून प्रोजेक्ट या मोठ्या फुग्यांद्वारे इंटरनेट देण्याची सोय आता लवकरच भारतामध्ये येण्याची शक्यता आहे. त्यासाठी गुगल व बीएसएनएल यांची एकत्र येण्याची तयारी सुरु आहे.
भारतामध्ये मोबाईल आणि संगणकांची संख्या दिवेसंदिवस वाठत असली तरी सर्वच राज्यांमध्ये आणि ग्रामीण भागात इंटरनेटची सोय पुरेशी नाही. गुगलने यासाठी मदतीची हात पुढे केला असून भारतातील अग्रगण्य कंपनी बीएसएनएलच्या मदतीने फुग्याद्वारे इंटरनेट पुरविण्यासाठी पायलट प्रोजेक्ट राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये २.६ गीगा हर्टझ ब्रॉडबँड सेवा देण्यात येणार असून येत्या फेब्रुवारीपासून हा पायलट प्रोजेक्ट सुरु होण्याची शक्यता वतर्विली जात आहे. सध्या न्यू झीलंड, कॅलिफोर्निया, श्रीलंका आणि ईशान्य ब्राझीलमध्ये असा बलून्सद्वारे इंटरनेट सुविधा दिली जात आहे.
पृथ्वीपासून साधारणत: वीस किमी उंच स्ट्रॅटोस्फिअरमध्ये उडत असतात. ज्या प्रदेशात ते उडतात तेथील स्थानिक कंपन्यांशी करार करुन त्यांना स्पेक्ट्रम उपलब्ध करुन दिला जातो. हे बलून्स ४० किमी व्यासाच्या परिसरामध्ये इंटरनेट उपलब्ध करुन देऊ शकतात. साधारणत: १०० दिवस झाल्यानंतर ते उतरविले जातात. (प्रतिनिधी)