ललित मोदीप्रकरणी पुन्हा इंटरपोलशी संपर्क
By admin | Published: May 30, 2016 03:19 AM2016-05-30T03:19:50+5:302016-05-30T03:19:50+5:30
आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदीप्रकरणी पुन्हा इंटरपोलशी संपर्क करण्यात येणार असल्याची माहिती तपास संस्थांनी दिली.
नवी दिल्ली : आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदीप्रकरणी पुन्हा इंटरपोलशी संपर्क करण्यात येणार असल्याची माहिती तपास संस्थांनी दिली. मोदी यांच्याविरुद्ध इंटरपोलचे अटक वॉरंट मिळविण्यासाठी हे प्रयत्न करण्यात येणार आहेत.
चेन्नई पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, मोदी चार अन्य यांच्याविरुद्ध गुन्हेगारी स्वरूपाचा तपास गतीने सुरू आहे. या पार्श्वभूमीवर तपास संस्थांनी हे पाऊल उचलले आहे. गुन्हे शाखेच्या तपास अधिकाऱ्यांनी अर्थ मंत्रालय आणि ईडीला सूचित केले आहे की, २०१० मध्ये बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्या तक्रारीवरून आर्थिक अनियमिततेच्या आरोपात ललित मोदी आणि अन्य सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी तपास सुरू आहे आणि पुरावे एकत्र केले जात आहेत.