PNB Scam: मेहुल चोकसी अमेरिकेतून फरार, इंटरपोलची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2018 01:13 PM2018-07-16T13:13:59+5:302018-07-16T13:18:37+5:30
रेड कॉर्नर नोटीस जारी करण्याच्या आधीच मेहुल चोकसी अमेरिका सोडून गेल्याचे समजते.
नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेला(पीएनबी) 14 हजार कोटी रुपयांना चुना लावून देशातून पळून गेलेल्या हिरे व्यापारी नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोकसी यांना पडकण्यासाठी इंटरपोलकने रेड कॉर्नर नोटीस जारी केले आहे. मात्र, मेहुल चोकसी अमेरिकेतून सुद्धा फरार झाला आहे. रेड कॉर्नर नोटीस जारी करण्याच्या आधीच मेहुल चोकसी अमेरिका सोडून गेल्याचे समजते.
गेल्या काही दिवसांपासून मेहुल चोकसी अमेरिकेत वास्तव्यास असल्याचे सांगण्यात येत होते. त्यामुळे, इंटरपोलच्या मदतीने त्याला भारतात आणता येईल , असे भारतीय तपास यंत्रणांना वाटत होते. मात्र, आता इंटरपोलकडून रेड कॉर्नर नोटीस जारी करण्याआधीच मेहुल चोकसी अमेरिका सोडून गेल्याचे सांगण्यात येत आहे.
पीएनबी घोटाळ्याच्या संदर्भात सीबीआय आणि ईडीने नीरव मोदी, त्याचा मामा मेहुल चोकसी व त्यांचा एक विश्वासू कर्मचारी सुभाष परब यांच्याविरुद्ध फसवणूक, लबाडी, विश्वासघात आणि मनी लॉड्रिंगची आरोपपत्रे दाखल केली आहेत. त्याआधारे रेड कॉर्नर नोटीस जारी करण्याची विनंती सीबीआयने इंटरपोल या जागतिक पोलीस संघटनेला केली होती. त्यानुसार नीरव मोदी, अशी नोटीस जारी करण्यात आली आहे.
दरम्यान, जगभरातील 192 देश इंटरपोलचे सदस्य आहेत. नोटिशीत उल्लेख केलेली व्यक्ती कुढे आढळली तर तिला लगेच ताब्यात घेण्याची अथवा माहिती कळविण्याची विनंती त्या देशांना करण्यात आली आहे.
देश सोडून पळून गेलेले नीरव मोदीचे आठ जवळचे साथीदार
1. सोनू शैलेष मेहता, ओराजेम कंपनी लिमिटेड
2. भाविक जयेश शाह, ब्रिलियंट डायमंड लिमिटेड
3. आशिष बजरंगलाल बागरिया, इटर्नल डायमंड्स कॉर्पोरेशन
4. नीलेश वालजीभाई खेतानी, फॅन्सी क्रिएशन्स कंपनी लिमिटेड
5. आशिष कुमार मोहनभाई लाड, सनशाइन जेम्स लिमिटेड
6. ज्योती संदीप मिस्त्री, डीजी ब्रदर्स एफजेडई
7. जिग्नेश किरण कुमार शाह, पॅसिफिक डायमंड एफजेडई
8. संदीप भारत मिस्त्री, वर्ल्ड डायमंड डिस्ट्रीब्यूशन एफजेडई