मनविसेच्या नव्या फळीसाठी मुलाखती
By admin | Published: March 24, 2015 11:06 PM2015-03-24T23:06:52+5:302015-03-24T23:48:28+5:30
अमित ठाकरेची उपस्थिती : जिल्हाभरातून कार्यकर्त्यांची हजेरी
अमित ठाकरेची उपस्थिती : जिल्हाभरातून कार्यकर्त्यांची हजेरी
नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची विस्कटलेली घडी बसविण्यासाठी राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी पुढाकार घेतला असून, प्रत्येक जिल्ांमध्ये मनविसेची नवी फळी तयार करण्यासाठी मुलाखत सत्र राबविण्यास सुरुवात केली आहे. आज नाशिकमध्ये जिल्हा व शहर कार्यकारिणीसाठी त्यांच्या उपस्थितीत मुलाखती घेण्यात आल्या. यासाठी जिल्हाभरातून कार्यकर्ते उपस्थित होते.
विधानसभा निवडणुकीनंतर मनविसेच्या अनेक पदाधिकार्यांनी इतर पक्षांमध्ये प्रवेश केल्याने कार्यकारिणीतील अनेक पदे रिक्त होती. या पदांवर निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी मिळावी, यासाठी अमित ठाकरे यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष आदित्य शिरोडकर यांनी जिल्हाभरातून आलेल्या कार्यकर्त्यांशी मुलाखतीच्या माध्यमातून संवाद साधून, त्यांची मते जाणून घेतली. यावेळी पक्षातील सहभाग, जबाबदारी स्वीकारण्याची क्षमता, पक्षवाढीसाठी प्रयत्न आदि प्रश्न विचारण्यात आले. दरम्यान, कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षात घेता उद्याही (दि.२५) मुलाखतीचे सत्र सुरूच राहणार आहे. मुलाखती घेतलेल्या सर्व कार्यकर्त्यांचा अहवाल पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला जाणार असून, त्यानंतरच पदांची घोषणा केली जाणार असल्याचे शिरोडकर यांनी स्पष्ट केले. यावेळी महापौर अशोक मुर्तडक, शहराध्यक्ष राहुल ढिकले, जिल्हाध्यक्ष सुदाम कोंबडे, खंडेराव मेढे, प्रकाश कोरडे, संदीप भवर, सागर देवरे, मनोज रामराजे, महेश ओवे आदि उपस्थित होते.
---
इन्फो
रुग्णवाहिकेचे उद्घाटन
रुग्ण सेवेसाठी मनसेच्या वतीने सुरू केलेल्या रुग्णवाहिका सेवेचे यावेळी अमित ठाकरे व आदित्य शिरोडकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. रुग्णवाहिका नाशिककरांच्या सेवेसाठी २४ तास उपलब्ध असेल, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
फोटो क्र. २४ पीएचएमआर २०५
मनविसे कार्यकारिणीसाठी कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेताना मनविसे प्रदेशाध्यक्ष आदित्य शिरोडकर. समवेत अमित ठाकरे, महापौर अशोक मुर्तडक, शहराध्यक्ष राहुल ढिकले.