असहिष्णुता, हिंसाचारामुळे राष्ट्रपती मुखर्जी यांना खंत
By admin | Published: January 20, 2017 06:25 AM2017-01-20T06:25:19+5:302017-01-20T06:25:19+5:30
परस्परांबद्दल आदर वाढवण्याची मोठी गरज असल्याचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी गुरुवारी सांगून वाढता संघर्ष आणि मतभेदांबद्दल खेद व्यक्त केला.
Next
दानतन (पश्चिम बंगाल) : समाजामध्ये परस्परांबद्दल आदर वाढवण्याची मोठी गरज असल्याचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी गुरुवारी सांगून वाढता संघर्ष आणि मतभेदांबद्दल खेद व्यक्त केला. समाजात अनेक प्रश्नांवर होत असलेल्या निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी वरील मत व्यक्त केले.
आज तुम्हाला वृत्तपत्रांत, दूरचित्रवाणी वाहिन्यांवर सततच्या हिंसाचाराच्या बातम्या दिसतात. मी आंतरराष्ट्रीय पातळीवरील हिंसाचाराबद्दल बोलत नाही तर आमच्या मनातील हिंसाचार, आमच्या जाणिवा आणि आत्म्यातील संघर्षाबद्दल बोलत आहे, असे मुखर्जी म्हणाले.