असहिष्णुता वाद चिघळला

By admin | Published: November 3, 2015 04:03 AM2015-11-03T04:03:19+5:302015-11-03T04:03:19+5:30

रालोआ सरकारविरुद्ध असहिष्णुतेवर व्याख्यान देण्याचे नाटक न करता काँग्रेसने १९८४ च्या शीखविरोधी दंगलींबद्दल शरमेने मान झुकवायला हवी, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी

Intolerant dispute | असहिष्णुता वाद चिघळला

असहिष्णुता वाद चिघळला

Next

पूर्णिया : रालोआ सरकारविरुद्ध असहिष्णुतेवर व्याख्यान देण्याचे नाटक न करता काँग्रेसने १९८४ च्या शीखविरोधी दंगलींबद्दल शरमेने मान झुकवायला हवी, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी काँग्रेसला लक्ष्य बनविले.
आज २ नोव्हेंबर आहे. तुम्हाला १९८४ आठवते काय? इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी देशभरात उफाळलेल्या दंगलींमध्ये लाखो शिखांची कत्तल झाली. काँग्रेस असहिष्णुतेवर व्याख्यान देत आहे. आज तोच दिवस आहे, असे सांगत त्यांनी ‘डूब मरो, डूब मरो’ असा टोला काँग्रेसला मारला. शीख पीडितांचे डोळे अद्यापही सुकले नाहीत. त्यांच्या जखमा अजून भरल्या नसताना तुम्ही २ नोव्हेंबर रोजी ‘ड्रामेबाजी’ करीत आहात, असे ते बिहारमधील पूर्णिया परिसरात निवडणूक प्रचारसभेला संबोधित करताना म्हणाले. काँग्रेसच्या नेतृत्वाने असहिष्णुतेच्या मुद्यावर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेऊन निवेदन देण्याची तयारी केली असताना मोदींनी काँग्रेसला प्रत्युत्तर दिले आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार संधिसाधू असल्याचा आरोप करताना त्यांनी २०११ मध्ये मुस्लिमांवर झालेल्या गोळीबाराचा उल्लेख केला. नितीशकुमार यांनी पीडितांबद्दल सहानुभूतीचा एकही शब्द व्यक्त केला नाही.
पुणे- मुंबई स्फोटांचे धागेदोरे महाआघाडीच्या नेत्यांपर्यंत
पुणे- मुंबई बॉम्बस्फोटांचे धागेदोरे बिहारच्या महाआघाडीतील नेत्यांपर्यंत पोहोचले आहेत. एका दलित महिला पोलीस अधिकाऱ्याने याचा छडा लावण्याचा प्रयत्न केला असता तिला बिहार सोडायला भाग पाडण्यात आले असा आरोप मोदींनी दरभंगा येथील प्रचारसभेत केला. या स्फोटांच्या वेळी ‘दरभंगा मोड्युल’ या शब्दांचा वापर झाला होता. याकडे मोदींनी लक्ष वेधले.
सर्वात हीन पंतप्रधान
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील सर्वात छोटे आणि हीन पंतप्रधान असल्याचा आरोप राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी टिष्ट्वटरवर केला आहे. आपण पंतप्रधान बनलो यावर मोदींचा विश्वासच बसत नाही. अशा प्रकारच्या लोकांच्या हातात देशाची राज्यघटना सुरक्षित नाही, असेही ते म्हणाले. (वृत्तसंस्था)


राहुल गांधी : ‘दाल रोटी’ मत खाओ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीत दिलेली आश्वासने पाळलेली नाहीत. त्यांनी भाववाढ कमी करण्याचे वचन दिले होते. ७० रुपये किलो असलेली तूरडाळ आता २०० रुपये किलोवर गेली आहे.
एकेकाळी लोक म्हणायचे, ‘दाल रोटी खाओ प्रभू के गुण गाओ’ आता दाल रोटी मत खाओ प्रभू के गुण गाओ असे लोकांनी म्हणावे अशी मोदींची इच्छा आहे.
रालोआची ही पाच वर्षे लवकर संपून जातील आणि काँग्रेस सत्तेवर येईल, असा विश्वास काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बिहारमधील अर्णिया येथे प्रचारसभेला संबोधित करताना व्यक्त केला.

व्ही.के. सिंग यांना टोला
कुणी कुत्र्यावर दगड भिरकावल्यास त्यासाठी सरकारला जबाबदार धरता येत नाही, असे विधान केंद्रीय राज्यमंत्री व्ही.के. सिंग यांनी केले होते. त्यावर राहुल गांधी म्हणाले की, फरिदाबाद येथील समाजकंटकांनी दलिताच्या घराला लावलेल्या आगीत दोन मुले होरपळून मृत्युमुखी पडली. त्या दोन मुलांना कुत्र्याची उपमा देता येणार नाही. ही मुले भारताचे नागरिक आणि देशाचे भविष्य होती.

Web Title: Intolerant dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.