बौद्ध समाजातील युवक, युवती परिचय मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मेळाव्यात १७00 युवक, युवतींनी दिला परिचय
By admin | Published: February 20, 2016 12:07 AM2016-02-20T00:07:06+5:302016-02-20T00:07:06+5:30
अकोला: यशोदय जनकल्याण बहूद्देशीय सांस्कृतिक, आरोग्य, क्रीडा, शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने शुक्रवारी प्रमिलाताई ओक सभागृहात आयोजित बौद्ध समाजाच्या नवव्या राज्यस्तरीय परिचय मेळाव्याला युवक, युवतींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मेळाव्यामध्ये राज्यातून, परदेशातून आलेल्या १७00 युवक, युवतींनी परिचय दिला. मेळाव्यासाठी ३ हजार युवक, युवतींनी नोंदणी केली होती. यावेळी बौद्ध समाजातील विवाहयोग्य युवक, युवतींची स्वप्नपूर्ती परिचय पुस्तिका प्रकाशित करण्यात आली. प्रमिलाताई ओक सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र दारोकार गुरुजी होते. प्रमुख अतिथी म्हणून अकोला बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. एस.जी. गवई, दीपक धांडे, ज्येष्ठ विधिज्ञ चंद्रकांत वानखडे, ॲड, प्रवीण तायडे, ॲड. गोळे, डॉ. प्रिया डोंगरे, मौलाना आझाद महामंडळाचे व्यवस्थापक संजय्
Next
अ ोला: यशोदय जनकल्याण बहूद्देशीय सांस्कृतिक, आरोग्य, क्रीडा, शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने शुक्रवारी प्रमिलाताई ओक सभागृहात आयोजित बौद्ध समाजाच्या नवव्या राज्यस्तरीय परिचय मेळाव्याला युवक, युवतींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मेळाव्यामध्ये राज्यातून, परदेशातून आलेल्या १७00 युवक, युवतींनी परिचय दिला. मेळाव्यासाठी ३ हजार युवक, युवतींनी नोंदणी केली होती. यावेळी बौद्ध समाजातील विवाहयोग्य युवक, युवतींची स्वप्नपूर्ती परिचय पुस्तिका प्रकाशित करण्यात आली. प्रमिलाताई ओक सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र दारोकार गुरुजी होते. प्रमुख अतिथी म्हणून अकोला बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. एस.जी. गवई, दीपक धांडे, ज्येष्ठ विधिज्ञ चंद्रकांत वानखडे, ॲड, प्रवीण तायडे, ॲड. गोळे, डॉ. प्रिया डोंगरे, मौलाना आझाद महामंडळाचे व्यवस्थापक संजय पहुरकर, एमपीजीपीचे शाखा अभियंता संजय इंगळे, बी.आर. धाकडे, देशकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, शाहीर वसंतदादा मानवटकर, पी.जे. वानखडे, सरकारी विधिज्ञ संध्या इंगळे, डॉ. मनोहर घुगे, गवई गुरुजी, देवीदास सपकाळ, अशोक धांडे, प्रा. रणजित इंगळे, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी भीमगीते सादर करण्यात आली. कार्यक्रमामध्ये मान्यवरांनी राज्यस्तरीय युवक, युवती परिचय मेळाव्याचे कौतुक केले. दरवर्षी या मेळाव्या समाजबांधवांची उपस्थिती आणि प्रतिसाद लाभत आहे. मेळाव्याला व्यापक स्वरूप प्राप्त होत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक यशोदय जनकल्याण बहूद्देशीय संस्थेचे अध्यक्ष प्रा. रणजित इंगळे यांनी केले. संचालन किरण पळसपगार यांनी केले. आभार किशोर इंगळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुधाकर पाटील, अरविंद दंदी, कांताराम तायडे, पंजाबराव वर, संकेत इंगळे, रेखा गवई, जितू सिरसाट, प्रमोद तायडे, सुनील तेलगोटे, ॲड. ओम खंडारे, ॲड. विद्याधर सरकटे, बादल वानखडे, गौतम इंगोले, शरद इंगोले, अमोल अंजनकर, राजाभाऊ भटकर, पूनम वानखडे, नागेश वानखडे, रेश्मा वानखडे, पूजा चराटे, श्वेता वाहुरवाघ, सचिन तेलगोटे, पिंटू वानखडे, छोटू पाटील, प्रवीण इंगळे यांनी प्रयत्न केले. (प्रतिनिधी)