घुसखोर दहशतवाद्यांना सर्जिकल स्ट्राईकद्वारे चोख प्रत्युत्तर - राष्ट्रपती

By Admin | Published: January 31, 2017 11:33 AM2017-01-31T11:33:15+5:302017-01-31T14:09:02+5:30

आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी ससदेच्या संयुक्त सभागृहापुढे अभिभाषण केले.

Intruder reply by intruder terrorists to surgical strikers - President | घुसखोर दहशतवाद्यांना सर्जिकल स्ट्राईकद्वारे चोख प्रत्युत्तर - राष्ट्रपती

घुसखोर दहशतवाद्यांना सर्जिकल स्ट्राईकद्वारे चोख प्रत्युत्तर - राष्ट्रपती

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३१ -  संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत असून त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी संसदेच्या संयुक्त सभागृहापुढे अभिभाषण केले. ' हे अधिवेशन ऐतिहासिक' असल्याचे सांगत राष्ट्रपतींनी सरकारने राबवलेल्या विविध योजना, धोरणांचा आढावा घेतला. गरीब, दलित, शोषित, शेतकरी आणि श्रमिक वर्ग सरकारच्या  धोरणात अग्रस्थानी असल्याचे त्यांनी नमूद केले. या भाषणात त्यांनी नोटांबदी व पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचाही उल्लेख केला. सतत होणा-या घुसखोरीला आळा घालण्यासाठी सर्जिकल स्ट्राईक हे चोख प्रत्युत्तर ठरेल असे त्यांनी नमूद केले. तर काळा पैसा, भ्रष्टाचार, बनावट नोटा आणि दहशतवादासाठी होणारा पैशांचा पुरवठा रोखण्यासाठी सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ रोजी ' नोटाबंदी'चा निर्णय घेतल्याचेही राष्ट्रपतींनी सांगितले.  दरम्यान आज आर्थिक सर्वेक्षणही प्रसिद्ध करण्यात येणार आहे. 
 
राष्ट्रपतींच्या अभिभाषणातील महत्वपूर्ण मुद्दे : 
 
- हे ऐतिहासिक अधिवेशन आहे.
 
- 'सबका साथ, सबका विकास', हेच आमच्या सरकारचं ध्येय.
 
- आत्तापर्यंत १.२ कोटींहून अधिक ग्राहकांनी एलपीजीची सबसिडी सोडली.
 
- गरीबांचे जीवनमान सुधारावे यासाठी आमच्या सरकारने अनेक प्रयत्न केले असून अनेक नव्या योजना आणल्या आहेत.
 
- जनशक्तीमुळे स्वच्छ भारत अभियानाचे जन-आंदोलनात रुपांतर झाले.
 
- २६ कोटी जनधन खाती उघडली गेली.
 
-  काळ्या पैशाविरोधात लढण्यासाठी नागरिकांनी सरकारला साथ दिली.
 
- विविध सामाजिक सुरक्षा योजनांअंतर्गत १३ कोटी गरीबांना सामावण्यात आले.
 
-प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत देशात घर नसलेल्या प्रत्येक गरीबाला हक्काचे घर देण्याचा सरकारचा निर्धार.
 
- पी व्ही सिंधू, साक्षी मलिक, दीपा कर्माकर यांनी भारतीय महिलांच्या सामर्थ्याचे दर्शन घडवले.
 
- दिनदयाल अंत्योदय योजने अंतर्गत तब्बल १६ हजार कोटी रुपये उपलब्ध करुन देण्यात आले.
 
- देशात सामाजिक आणि आर्थिक समानता निर्माण करण्यास केंद्र सरकार कटीबद्ध आहे.
 
-  आगरतळा-त्रिपुरा रेल्वे मार्ग ब्रॉडगेज मार्गांना जोडणार.
 
-  सहा लाख दिव्यांगांना रोजगार देण्याचे सरकारचे लक्ष्य आहे.
 
- वन रँक वन पेन्शनचा प्रश्न केंद्र सरकारने निकाली काढला.
 
- आमच्या लष्कराचा आम्हाला अभिमान वाटतो.
 
-  स्टँडअप इंडियाच्या माध्यमातून सरकार अडीच लाख एससी, एसटी आणि महिला उद्योजकांना मदत करणार.
 
- काळा पैसा, भ्रष्टाचार, बनावट नोटा आणि दहशतवादासाठी होणारा पैशांचा पुरवठा रोखण्यासाठी सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ रोजी ' नोटाबंदी'चा निर्णय घेतला.
 
- भारतनेट उपक्रमाअंतर्गत देशातील ७५ हजार ७०० ग्रामपंचायतीना ऑप्टीकल फायबर केबलशी जोडणार.
 
- सातवा वेतन आयोग लागू झाल्याने ५० लाख कर्मचारी आणि ३५ लाख निवृत्त कर्मचा-यांना झाला फायदा .
 

Web Title: Intruder reply by intruder terrorists to surgical strikers - President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.