घुसखोराचा मृतदेह आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 03:07 AM2018-02-20T03:07:09+5:302018-02-20T03:07:15+5:30

जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यामध्ये नियंत्रण रेषेवर एका पाकिस्तानी घुसखोराचा मृतदेह भारतीय जवानांना आढळला. त्याच्याकडे शस्त्रास्त्रांचा प्रचंड साठा असल्याचेही दिसून आले.

The intruder's body was found | घुसखोराचा मृतदेह आढळला

घुसखोराचा मृतदेह आढळला

googlenewsNext

जम्मू : जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यामध्ये नियंत्रण रेषेवर एका पाकिस्तानी घुसखोराचा मृतदेह भारतीय जवानांना आढळला. त्याच्याकडे शस्त्रास्त्रांचा प्रचंड साठा असल्याचेही दिसून आले. भारतीय जवानांनी रविवारी सायंकाळी त्या ठिकाणी भारतात घुसखोरी करण्याच्या अतिरेक्यांच्या डाव उधळून लावला होता.
पाकिस्तानच्या बॉर्डर अ‍ॅक्शन टीमचे (बॅट) सैनिक एकीकडे भारताच्या दिशेने गोळीबार करीत असताना, दहशतवाद्यांचे घुसखोरीचे प्रयत्न सुरू होते. मात्र भारतीय जवानांनी बॅटच्या गोळीबाराला जोरदार प्रत्युत्तर दिले आणि घुसखोरीही होऊ दिली नाही. त्यावेळी हा घुसखोर ठार झाला असावा, असा अंदाज आहे. त्या कारवाईत भारताचे तीन जवान जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्या परिसरात लष्कराकडून स्फोटकांचा शोध घेऊन निकामी करण्याचे काम सुरू होते. यावेळी हा मृत अवस्थेतील घुसखोर आढळल्याचे लष्कराने स्पष्ट केले आहे. (वृत्तसंस्था)

बडगामच्या हवाई दलाच्या स्टेशनमध्ये घुसू पाहणाºया एका इसमाला सुरक्षा दलाच्या जवानांनी ठार केले. तो आत घुसण्याचा प्रयत्न केला असता, जवानांनी त्याला वारंवार आत न येण्याच्या सूचना दिल्या. तरीही तो आत येत होता. त्यामुळे जवानांना गोळीबार करावा लागला. मात्र तो दहशतवादी नसून, मनोरुग्ण होता, असे नंतर तपासणीत उघड झाले.

दीड महिन्यात ११ जवान ठार
चालू वर्षात आतापर्यंत पाकच्या हल्ल्यामुळे भारताचे ११ सुरक्षा जवान शहीद झाले आहेत तर ९ नागरिक मरण पावले आहेत. नियंत्रण रेषेलगत कारवायांमध्ये ७५ जण जखमी झाले. रविवारी मनकोट सब सेक्टरमध्ये एक कनिष्ठ श्रेणीतील सैन्य अधिकारी भूसुरुंगावर पाय पडल्याने झालेल्या स्फोटात जखमी झाल्याचे कळवण्यात आले आहे.

Web Title: The intruder's body was found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.