बारा रुपये दराने पेट्रोल खरेदी गेले अन् 12 वाजले; पाहा नेमके काय घडले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2020 03:16 PM2020-07-02T15:16:43+5:302020-07-02T15:36:45+5:30

पेट्रोल-डिझेलच्या किमतीत सातत्याने वाढ होत असल्याने अनेकांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. तसेच काही ठिकाणी या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे.

intuc distributes 12 rupees liters petrol people fill tank laying lines police registers fir | बारा रुपये दराने पेट्रोल खरेदी गेले अन् 12 वाजले; पाहा नेमके काय घडले

बारा रुपये दराने पेट्रोल खरेदी गेले अन् 12 वाजले; पाहा नेमके काय घडले

नवी दिल्ली - देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना लोकांच्या खिशावरील भार वाढत आहे. इंधन दरवाढीचा भडका उडाला असून दरवाढ सुरु आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. लॉकडाऊनमध्ये इंधनाचे दर वाढत नव्हते. मात्र आता पुन्हा एकदा इंधन दरवाढीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागणार आहे. पेट्रोल-डिझेलच्या किमतीत सातत्याने वाढ होत असल्याने अनेकांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. तसेच काही ठिकाणी या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे.

इंडियन नेशनल ट्रेड यूनियन काँग्रेसने इंधनाच्या दरातील वाढीला विरोध दर्शवला आहे. तसेच 12 रुपये प्रति लीटरने सर्वसामान्यांना पेट्रोल देण्याची सोय केली. लोकांना जेव्हा 12 रुपयांत पेट्रोल मिळतं याची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी पेट्रोल खरेदीसाठी प्रचंड गर्दी केली. यामुळे सोशल डिस्टंन्सिंगचा फज्जा उडाला. पेट्रोल भरणं लोकांना चांगलंच महागात पडलं आहे. कारण पोलिसांनी 20 ते 25 जणांवर एफआयआर दाखल केल्याची माहिती मिळत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या कल्याणपूर येथे इंटक राष्ट्रीय उपाध्यक्ष विजय मार्तोलिया यांच्या नेतृत्वात पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दराविरोधात एक अनोखं आंदोलन करण्यात आलं. इंटकच्या कार्यकर्त्यांनी एका पेट्रोल पंपावर सामान्य नागरिकांना 12 रुपये प्रति लीटर पेट्रोल देण्यात येईल असा बॅनर लावत आंदोलन केलं. यानंतर पेट्रोल खरेदीसाठी लोकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली. पेट्रोल पंपावर यामुळे नियमांचे पालन केलं गेलं नाही. 

इंटकने या आंदोलनासाठी पोलिसांकडून कोणतीही परवानगी घेतलेली नव्हती. तसेच यामुळे लोकांची गर्दी झाली आणि सोशल डिस्टंन्सिंगचा फज्जा उडाला. पोलिसांनी याप्रकरणी विजय मार्तोलियासह 20 ते 25 लोकांवर एफआयआर दाखल केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. तेल कंपन्यांनी 16 मार्च नंतर 83 दिवसांसाठी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये कोणतही वाढ केली नव्हती. लॉकडाऊनमध्ये राज्यांनी व्हॅल्यू अ‍ॅडेड टॅक्स (VAT) मध्ये वाढ केल्यामुळे इंधनाच्या किंमती वाढल्या होत्या. त्यावेळी तेल कंपन्यांनी कोणती वाढ केली नव्हती. त्यानंतर आता पेट्रोल-डिझेल महागले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

"चीनच्या आक्रमकतेसमोर झुकणार नाही हे भारताने दाखवून दिलं"

Video - ...अन् एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं; म्यानमारमधील खाणीत भूस्खलन, 50 जणांचा मृत्यू

CoronaVirus News : कोरोनाशी लढण्यासाठी देशाला 'या' पॅटर्नची गरज; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी मुलाच्या विवाहात कुटुंबीयांसमवेत धरला ठेका

Sushant Singh Rajput Suicide : आत्महत्येपूर्वी सुशांतने गुगलवर 'हे' केलं होतं सर्च

CoronaVirus News : धोका वाढला! ५ दिवसांत १ लाख नवे रुग्ण; कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ

Web Title: intuc distributes 12 rupees liters petrol people fill tank laying lines police registers fir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.