अवैध जमिनीचे वाटप रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 04:24 AM2019-05-29T04:24:00+5:302019-05-29T04:24:02+5:30

इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट टेक्नॉलॉजीला देण्यात आलेल्या (आयएमटी) जमिनीचे वाटप गाझियाबाद विकास प्राधिकारणाने रद्द केले आहे.

Invalid land allocation canceled | अवैध जमिनीचे वाटप रद्द

अवैध जमिनीचे वाटप रद्द

Next

गाझियाबाद : इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट टेक्नॉलॉजीला देण्यात आलेल्या (आयएमटी) जमिनीचे वाटप गाझियाबाद विकास प्राधिकारणाने रद्द केले आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे पुत्र बकुल नाथ या संस्थेचे अध्यक्ष आहेत.
गाझियाबाद विकास प्राधिकरणाचे उपाध्यक्ष कांचन वर्मा यांनी चौकशी समितीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केला आणि जमिनीचा ताबा परत घेण्याचे आणि तिथे बांधलेले वसतिगृह तोडण्याचे आदेश दिले. भाजपचे नगरसेवक राजेंद्र त्यागी यांनी राजनगर सेक्टर-२० मध्ये आयएमटी परिसरात जमिनीवर अवैध ताबा केला गेल्याचा आरोप केला होता. आयएमटीने त्यावर अवैध बांधकाम केले होते. (वृत्तसंस्था)

Web Title: Invalid land allocation canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.