स्मृती इराणींच्या शैक्षणिक पात्रतेची चौकशी करा - मोदींच्या भावाची मागणी
By admin | Published: June 18, 2015 12:42 PM2015-06-18T12:42:57+5:302015-06-18T12:43:44+5:30
केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांच्या शैक्षणिक पात्रतेची चौकशी करावी अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू प्रल्हाद मोदी यांनी केली आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १८ - दिल्लीतील माजी कायदामंत्री जितेंद्र तोमर यांच्याप्रमाणेच केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांच्या शैक्षणिक पात्रतेची चौकशी करावी अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू प्रल्हाद मोदी यांनी केली आहे.
अखिल भारतीय फेअर प्राइज शॉप डीलर्स असोसिएशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष असलेले प्रल्हाद मोदी यांनी नुकताच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या दरम्यान प्रल्हाद मोदींनी थेट स्मृती इराणींनाच लक्ष्य केले. स्मृती इराणींच्या शैक्षणिक पात्रतेची सखोल चौकशी करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. इराणी यांनी लोकसभा निवडणुकीत दिलेली शैक्षणिक माहिती व राज्यसभेच्या उमेदवारी अर्जावर दिलेली शैक्षणिक माहिती यात तफावत असून तेव्हापासून आप व काँग्रेस इराणी यांच्या शैक्षणिक पात्रतेविषयी चौकशीची मागणी करत आहे. आता थेट मोदींच्या भावानेच विरोधकांच्या सुरात सूर मिसळल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
सुषमा स्वराज यांनी माणूसकीच्या दृष्टीकोनातून त्यांना मदत केली होती, या प्रकरणाला नाहक महत्त्व दिले जात आहे असे सांगत त्यांनी सुषमा स्वराज यांचा बचाव केला.