एम्ब्रेअर विमानांच्या सौद्याची चौकशी करा

By admin | Published: September 15, 2016 03:03 AM2016-09-15T03:03:08+5:302016-09-15T03:03:08+5:30

ब्राझिलची विमान उत्पादक कंपनी एम्ब्रेअरशी भारताने २00८ साली केलेल्या २0.८ कोटी डॉलर्सच्या विमान सौद्यात, लाचखोरी झाल्याचा वाद उद्भवल्यानंतर संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकरांनी बुधवारी

Investigate an embroidery aircraft deal | एम्ब्रेअर विमानांच्या सौद्याची चौकशी करा

एम्ब्रेअर विमानांच्या सौद्याची चौकशी करा

Next

सुरेश भटेवरा,  नवी दिल्ली
ब्राझिलची विमान उत्पादक कंपनी एम्ब्रेअरशी भारताने २00८ साली केलेल्या २0.८ कोटी डॉलर्सच्या विमान सौद्यात, लाचखोरी झाल्याचा वाद उद्भवल्यानंतर संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकरांनी बुधवारी सीबीआयला सदर प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले.
एम्ब्रेअर कंपनी व भारत सरकारची संरक्षण संशोधन विकास संघटना (डीआरडीओ) दरम्यान ३ विमानांच्या खरेदीसाठी हा सौदा झाला होता. या वादग्रस्त सौद्यात लाचखोरीचे आरोप गंभीर स्वरूपाचे असल्याने संरक्षण मंत्रालयाला थेट सीबीआय चौकशीचाच निर्णय घ्यावा लागला, असे मंत्रालयाच्या सूत्रांकडून समजले.
सीबीआय चौकशीचे आदेश जारी होण्यापूर्वी मंगळवारी डीआरडीओचे प्रमुख एस. क्रिस्तोफर यांनी संरक्षण मंत्री पर्रिकरांची भेट घेतली. या भेटीत २0.८ कोटी डॉलर्सच्या विमान सौद्याशी संबंधित सारी माहिती त्यांनी दिली. एअरबॉर्न अर्ली वॉर्निंग कंट्रोल सिस्टिमसाठी स्वदेशी रडार युक्त ३ विमाने खरेदी करण्यासाठी एम्ब्रेअर कंपनी व डीआरडीओ दरम्यान २00८ साली करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. प्रसारमाध्यमात या सौद्यातील लाचखोरी संबंधात प्रसृत झालेल्या वृत्ताबाबत डीआरडीओ ने ब्राझिलच्या एम्ब्रेअर कंपनीशी संपर्क साधून अगोदरच स्पष्टीकरण मागवले आहे. युपीए सरकार सत्तेवर असतांना हा करार झाला असल्याने काँग्रेसवर हल्ला चढवण्याची नवी संधी भाजपला मिळाली आहे.
सौद्याबाबत बोलतांना सप्ताहाच्या सुरुवातीलाच संरक्षण मंत्र्यांनी स्पष्ट केले होते की केवळ प्रक्रियेतल्या विसंगतीपुरते सदर प्रकरण मर्यादित असेल, तर संरक्षण मंत्रालय त्याची अंतर्गत चौकशी करेल. तथापि सदर व्यवहारात गुन्हेगारी स्वरूपाचा कोणताही कोन आढळल्यास चौकशी सीबीआयकडे सोपवली जाईल, कारण संरक्षण मंत्रालय ही चौकशी करू शकत नाही.

Web Title: Investigate an embroidery aircraft deal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.