महिला पोलिसांकडे देणार महत्वाच्या गुन्ह्यांच्या तपास
By admin | Published: February 29, 2016 02:14 AM2016-02-29T02:14:34+5:302016-02-29T02:14:34+5:30
- महासंचालकांची सूचना
Next
- हासंचालकांची सूचनाजमीर काझीमुंबई : बहुतांश महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांना वायरलेस, वर्षाच्या नोंदी, बंदोबस्त अशी तुलनेत दुय्यम काम वरिष्ठांकडून दिले जात असल्याचे चित्र आहे. आता मात्र त्यामध्ये बदल होण्याची चिन्हे असून या अधिकार्यांकडे महत्वाचे गुन्हे व आर्थिक गुन्ांचे तपासाची जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. तशा सूचना पोलीस महासंचालक प्रविण दीक्षित यांनी पोलीस अधिकार्यांना दिल्या आहेत.महिला अधिकारी व कॉन्स्टेबल यांना अनेकदा बिनतारी संदेश, बारनिशी, क्राईमचे रेकार्ड तयार करण्याचे काम दिले जाते. आता त्यांना महत्वाचे गुन्हे व आर्थिक गुन्ांचे तपास काम देण्याबरोबरच आवश्यकतेप्रमाणे सर्व प्रकारच्या ड्युटी देण्यात यावेत, त्यासाठी त्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन करण्याची सूचना दीक्षित यांनी केली असून त्याबाबतचा कार्यवाही अहवाल पोलीस मुख्यालयात सादर करावा लागणार आहे.प्रविण दीक्षित यांनी परिपत्रक जारी करून सर्व पोलीस आयुक्त/अधीक्षकांना सूचना केल्या आहेत. त्यामध्ये आपल्या कार्यक्षेत्रातील पोलीस ठाणे, शाखेमध्ये नेमणूकीला असलेल्या महिला अधिकारी/कर्मचार्यांना सर्व प्रकारच्या ड्युटी द्याव्यात व त्यांचे मनोधैर्य वाढविण्यात यावे, असे नमूद केले आहे.----------महिला पोलिसांमध्ये गुन्ाचा सक्षमपणे तपास करण्याची क्षमता असूनही बहुतांशवेळा वायरलेस, क्राईम रेकॉर्ड व बारनिशीचे काम सर्रासपणे दिले जाते. त्यामुळे ही परिस्थिती बदलण्यासाठी त्यांना आवश्यकतेप्रमाणे सर्व प्रकारच्या ड्युटी द्यावी, योग्य प्रकारे मार्गदेण्याबाबतची अधिकार्यांना करण्यात आलेली आहे.- प्रविण दीक्षित, पोलीस महासंचालक