तपास सामूहिक बलात्काराचा, सापडले काळ्या पैशांचे घबाड; आयएएस, माजी आमदाराविरुद्ध कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 07:57 AM2024-07-25T07:57:29+5:302024-07-25T08:00:02+5:30
प्रकरण दाबण्यासाठी मुलाच्या नावावर दोन कोटी रुपये गुंतवण्यात आले होते.
पाटणा : आयएएस अधिकारी संजीव हंस आणि माजी आमदार गुलाब यादव यांच्यावरील सामूहिक बलात्काराच्या आरोपांच्या तपासात त्यांच्या काळ्या पैशांची साखळीही उघड होत आहे.
पाटणा वरिष्ठ पोलिस अधीक्षकांच्या अहवालात रिसॉर्टपासून ते मर्सिडीजचा उल्लेख आहे. ईडीची ही कारवाई सामूहिक बलात्काराच्या तपासाचाच पुढचा भाग आहे. संजीव हंस हे १९९७ च्या बॅचचे आयएएस आहेत. आपल्या काळ्या पैशातून त्याने चंडीगडमध्ये ९५ कोटी रुपयांचे रिसॉर्ट विकत घेतले आहे. बिहारमध्ये त्याने प्रीपेड मीटरची मागणी इतकी वाढवली की मीटरधारकांनी त्याला मर्सिडीज कार भेट दिली. संजीवकडची मालमत्ता पाहून तपास यंत्रणाही चक्रावून गेल्या आहेत.
प्रकरण काय?
पीडितेचे अनेक गर्भपात झाले; पण नंतर तिने एका मुलाला जन्म दिला. गुलाब यादव व संजीव हंस यांनी अत्याचार केल्यानंतर या मुलाचा जन्म झाला, पण ते मूल म्हणून कोणीही स्वीकारले नाही. नंतर प्रकरण दाबण्यासाठी मुलाच्या नावावर दोन कोटी रुपये गुंतवण्यात आले होते.