विद्यार्थ्यांच्या मृत्यूची चौकशी; केंद्रीय गृह मंत्रालयाने नेमली उच्चस्तरीय चौकशी समिती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 05:19 AM2024-07-30T05:19:28+5:302024-07-30T05:20:26+5:30

विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाख रुपयांची नायब राज्यपालांकडून मदत जाहीर

investigation into student deaths a high level inquiry committee appointed by the union home ministry | विद्यार्थ्यांच्या मृत्यूची चौकशी; केंद्रीय गृह मंत्रालयाने नेमली उच्चस्तरीय चौकशी समिती

विद्यार्थ्यांच्या मृत्यूची चौकशी; केंद्रीय गृह मंत्रालयाने नेमली उच्चस्तरीय चौकशी समिती

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : जोरदार पावसामुळे दिल्लीतील जुने राजेंद्रनगर येथे शनिवारी राऊ आयएएस कोचिंग सेंटरच्या तळघरात पाणी शिरून तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला होता. या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी लोकसभेत सर्व पक्षांनी केली. त्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने अतिरिक्त सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय चौकशी समिती सोमवारी स्थापन केली. त्यामध्ये दिल्ली सरकारमधील प्रधान सचिव (गृहखाते), दिल्लीचे विशेष पोलीस आयुक्त, अग्निशमन सल्लागार यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.

दरम्यान, या प्रकरणी मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत नायब राज्यपालांनी जाहीर केली आहे आहे. सोमवारी दुर्घटनेच्या चौकशीसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. काँग्रेसचे खासदार के. सी. वेणुगोपाल यांनी सांगितले की, राऊ आयएएस कोचिंगची इमारत अनधिकृत होती. काही कोचिंग सेंटर माफिया बनले आहेत.

आम्ही भरपाई घेऊन काय करणार?

आम्ही भरपाई घेऊन काय करणार? त्यापेक्षा दोषी व्यक्तींवर कडक कारवाई करा, अशी मागणी नवीन दलवीन या मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी केली. उत्तरीय तपासणीनंतर त्याचा मृतदेह कुटुंबीयांच्या हवाली करण्यात आला. त्याचे काका राज यांनी सांगितले की, नवीनचा मृतदेह त्रिवेंद्रम येथे नेण्यात आला असून त्याच्यावर मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येतील.

कारवाई करण्याचे नायब राज्यपालांचे आश्वासन

आयएएस कोचिंग सेंटरच्या दुर्घटनेत तीन विद्यार्थी मरण पावले होते. त्या घटनास्थळी दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी सोमवारी भेट देऊन तिथे निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांशी चर्चा केली. या प्रकरणी दोषी असणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे सक्सेना यांनी निदर्शकांना सांगितले. या दुर्घटनेच्या निषेधार्थ भाजप कार्यकर्त्यांनी दिल्लीतील आप कार्यालयासमोर निदर्शने केली. दिल्ली पालिका अधिकाऱ्यांची राऊ कोचिंग सेंटरसंदर्भातील पोलिस चौकशी करण्याची शक्यता आहे. 

‘हे गॅस चेंबरइतकेच भयानक’

कोचिंग सेंटरचे पेव फुटले असून, त्यांच्या इमारती गॅस चेंबर इतक्याच भयानक असतात. स्पर्धा परीक्षांच्या पूर्वतयारीच्या नावाखाली उघडण्यात आलेली सेंटर जाहिरातींसाठी करत असलेल्या प्रचंड खर्चाची चौकशी झाली पाहिजे, असे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सभागृहात सांगितले. दुर्घटनेबाबत राज्यसभेत काही काळ चर्चा झाली. कोचिंग सेंटर हा व्यवसाय झाला आहे. त्यात या सेंटरना मिळणाऱ्या अमाप पैशामुळे शिक्षणाचेही व्यावसायिकरण झाले, असे धनखड म्हटले.
 

Web Title: investigation into student deaths a high level inquiry committee appointed by the union home ministry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :delhiदिल्ली