देशभरात गुंतवणूक घोटाळा !

By admin | Published: March 27, 2016 03:33 AM2016-03-27T03:33:07+5:302016-03-27T03:33:07+5:30

महाराष्ट्रासह देशभरातील पॉन्झी कंपन्यांविरुद्ध आता जवळजवळ तपासयुद्ध पुकारले गेल्याचे संकेत मिळाले आहेत. आरबीआयने १०४ कंपन्यांबाबतच्या तक्रारींचा समावेश असलेल्या प्रकरणांमध्ये विशेष तपास चालविला आहे.

Investigation scam across the country! | देशभरात गुंतवणूक घोटाळा !

देशभरात गुंतवणूक घोटाळा !

Next

- हरीश गुप्ता,  नवी दिल्ली
महाराष्ट्रासह देशभरातील पॉन्झी कंपन्यांविरुद्ध आता जवळजवळ तपासयुद्ध पुकारले गेल्याचे संकेत मिळाले आहेत. आरबीआयने १०४ कंपन्यांबाबतच्या तक्रारींचा समावेश असलेल्या प्रकरणांमध्ये विशेष तपास चालविला आहे.
या कंपन्यांकडे सार्वजनिक गुंतवणूक केली गेल्याचा संशय असल्याचे आरबीआयने सरकारला सांगितले आहे. सीबीआय, सक्तवसुली संचालनालय (ईडी) तसेच कंपनी व्यवहार मंत्रालयांतर्गत येणाऱ्या सेबी आणि विशेष तपास संघटनांनी (एसएफआयओ) पॉन्झी/ चिटफंड कंपन्यांबाबत स्वतंत्र तपास चालविला आहे. शेकडो गरीब गुंतवणूकदारांचा पैसा या कंपन्यांमध्ये गुंतविला गेला आहे. विविध
तपास संस्थांकडून गोळा केलेल्या
माहितीचे विश्लेषण करण्यात आले
असता गुंतवणुकीची आकडेवारी
३३,१४१ कोटी रुपयांवर जाते. महाराष्ट्रातील ४६९७.६७ कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या किमान १८ कंपन्यांविरुद्ध
तपास करून कारवाई सुरू करण्यात आलेली आहे.

तपासामधील समन्वयासाठी राज्यस्तरीय समित्या...
पंजाबमधील पर्ल समूहातील कंपन्यांबाबत तपास अद्याप प्रगतिपथावर आहे. सुमारे ४५ हजार कोटी रुपयांची रक्कम या कंपन्यांत गुंतवली गेली आहे. सहारा समूहाविरुद्ध दोन वर्षांपूर्वी सेबीने कारवाई सुरू केली होती.
प. बंगाल, झारखंड, ईशान्येकडील राज्ये तसेच ओडिशापर्यंत ही व्याप्ती वाढविण्यात आली आहे. चिटफंड कंपन्या राज्य सरकारांच्या अखत्यारीत येत असून आरबीआय, सेबी आणि अन्य तपास संस्थांमध्ये अधिक समन्वय राखण्यासाठी राज्यस्तरीय समन्वय समित्या (एसएलसीसी) स्थापन केल्या आहेत.
केंद्रीय तपास संस्थांनी दाखल
केलेल्या तक्रारीच्या आधारावर महाराष्ट्र सरकारने घोटाळ्यातील रक्कम १० हजार कोटींपेक्षा जास्त असल्याचा अंदाज वर्तवला आहे. प्रत्यक्षात या राज्यातील घोटाळा ४० हजार कोटींपेक्षा जास्त असल्याचा दावा चिटफंड घोटाळ्याविरुद्ध मोहीम छेडणारे भाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे.

१६४ प्रकरणांचा तपास : एकदा तपास पूर्ण झाल्यानंतर घोटाळ्यातील रक्कम कितीतरी जास्त असल्याचा अंदाज लावता येईल. आरबीआयसह एसएफआयओने स्वतंत्र तपास चालविला आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी एसएफआयओकडे १६४ प्रकरणांचा तपास सोपविला आहे. ३१ डिसेंबर २०१५ रोजी या प्रकरणी ७८ कंपन्यांचा तपास पूर्ण करण्यात आला तर अन्य ४६ कंपन्यांविरुद्ध तपास सुरू आहे. शारदा, रोझ व्हॅली, सीमलेस, आय कोर आणि अन्य कंपन्यांविरुद्धचा तपास पूर्ण करण्यात आल्याचे अर्थ मंत्रालयाच्या सूत्रांनी स्पष्ट केले. आणखी कंपन्यांसंबंधी तपास येत्या दोन महिन्यांमध्ये पूर्ण केला जाऊ शकतो. तपास केला जात असलेल्या कंपन्यांसंबंधी डाट्याचे विश्लेषण करण्यासाठी एसएफआयओने संगणक न्यायवैद्यक प्रयोगशाळा स्थापन केली आहे.

देशातील कंपन्या
रोझ व्हॅली रिअलकॉम
लिमिटेड (१९ कंपन्या) १०२८१
आय क्रोे ग्रुप....
(१२ कंपन्या) ७३७५
सीमलेस आऊटसोर्सिंग एलएलपी (३ कंपन्या) ३४९४
शारदा/ ग्लोबल आॅटोमोबाईल्स लिमिटेड (१४ कंपन्या) २३९४
शारदा/ बासील एक्स्प्रेस
लिमिटेड (५ कंपन्या) १७२१
यूआरओ ग्रुप.... १५००
अल्केमिस्ट होल्डिंग
लिमिटेड.... १०८८
अर्थतत्त्व ५००
आॅप्शन वन इंडस्ट्रीज
लिमिटेड १०००
युनीपे २ यू प्रॉडक्शन
प्रा. लिमिटेड ७९२
एनव्हीडी सोलर ५९५
सीशोअर समूह ४७८
एसजीआय रिसर्च
अ‍ॅण्ड अ‍ॅनलसिस ४९४
अ‍ॅनेक्स इन्फ्रास्ट्रक्चर २००
विश्वमित्र इंटरनॅशनल
इन्फ्रा १०६
रिमेल समूह १००
अन्य ५१ कंपन्या १०२३

महाराष्ट्रातील कंपन्या
सीमलेस आउटसोर्सिंग
एलएलपी (३ कंपन्या) ३४९४
आॅप्शन वन इंडस्ट्री लि. १०००
विश्वमित्र इंटरनॅशनल
इन्फ्रा १०६.७५
सेल इंडस्ट्री १५.६१
वासनकर वेल्थ मॅनेजमेंट १३
इक्विनॉक्स इन्फ्राटेक १२.४७
अँजेल ग्रुप १२
आरबीएक्स लॅण्ड
डेव्हलपर्स ११.९८ कोटी
अन्य ८ कंपन्या ३१.८६ कोटी
एकूण ४६९७.६७ कोटी

Web Title: Investigation scam across the country!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.