स्वाती मालीवाल यांच्यासोबत झालेल्या गैरवर्तन प्रकरणी चौकशी होणार; NCW ने बिभव कुमार यांना समन्स पाठवले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 03:00 PM2024-05-16T15:00:02+5:302024-05-16T15:01:18+5:30
आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांच्याशी गैरवर्तन केल्याप्रकरणी बिभव कुमार यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.
राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे निकटवर्तीय बिभव कुमार यांना आम आदमी पक्षाने राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांच्याशी गैरवर्तन केल्याप्रकरणी समन्स बजावले आहे.
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
राष्ट्रीय महिला आयोगाने बिभव कुमार यांना उद्या १७ मे रोजी चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे. बिभव कुमार यांच्यावर दिल्लीतील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आप खासदार स्वाती मालीवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. स्वाती मालीवाल या दिल्ली महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा आहेत.
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलचे अतिरिक्त सीपी प्रमोद सिंह कुशवाह आणि उत्तर जिल्ह्याचे अतिरिक्त डीसीपी नवी दिल्लीतील राज्यसभा सदस्य स्वाती मालीवाल यांच्या घरी गेले होते.
NCW summons Bibhav Kumar, former PS to Delhi CM Arvind Kejriwal to appear before the National Commission for Women tomorrow.
— ANI (@ANI) May 16, 2024
Bibhav Kumar has been accused of assaulting AAP MP Swati Maliwal at the CM's residence in Delhi. pic.twitter.com/TcngrC8vY2