गुंतवणुकीचा वाढला ओघ

By admin | Published: December 21, 2014 01:31 AM2014-12-21T01:31:04+5:302014-12-21T01:31:04+5:30

सरत्या वर्षात देशातील परस्पर निधींमधील गुंतवणूक साडेसतरा टक्क्यांनी वाढली आहे. आता या निधींकडे सुमारे १४ लाख १७ हजार ३३५.५० लाख रुपयांची मालमत्ता आहे.

The investment increased | गुंतवणुकीचा वाढला ओघ

गुंतवणुकीचा वाढला ओघ

Next

म्युच्युअल फंड : काहींना फटका, काहींना लाभ; साडेसतरा टक्क्यांहून अधिक वाढ

सर्वसामान्यांना शेअर बाजारातील गुंतवणुकीचे फायदे मिळवून देण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या परस्पर निधींमुळे (म्युच्युअल फंड) सामान्यांचा फायदा होतो की नाही हा वादाचा विषय असला तरी देशातील परस्पर निधींमधील गुंतवणुकीमध्ये वाढ होत आहे, ही वस्तुस्थिती नाकारता येणारी नाही. सरत्या वर्षात देशातील परस्पर निधींमधील गुंतवणूक साडेसतरा टक्क्यांनी वाढली आहे. आता या निधींकडे सुमारे १४ लाख १७ हजार ३३५.५० लाख रुपयांची मालमत्ता आहे.
भारतीय परस्पर निधींमधील गुंतवणूक वाढत्या प्रमाणात होत आहे. मागील सात महिन्यांपासून शेअर बाजारात असलेल्या तेजीमुळे सर्वसामान्य गुंतवणूकदार पुन्हा एकदा शेअर बाजाराकडे आकर्षित होऊ लागला आहे.
ज्या परस्पर निधींमध्ये गुंतवणूक करून फारसा परतावा मिळत नाही, अशांमधून बाहेर पडण्यासही गुंतवणूकदार आता मागे-पुढे बघत नाहीत. ज्यांच्या व्यवस्थापनाबाबत शंका येत असते त्यांना त्याचा फटका बसतो, हेच सरत्या वर्षात दिसून आले आहे.
चालू वर्षातील पहिले चार महिने देशातील परस्पर निधी उद्योगाला वाईट गेले असले तरी त्यानंतर मात्र त्यांनाही ‘अच्छे दिन’ दिसू लागले आहेत.
मे महिन्यापासून या उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे. मागील वर्षात देशातील परस्पर निधींमध्ये झालेली गुंतवणूक आणि यावर्षातील गुंतवणूक यामध्ये तुलना केली असता यंदा त्यामध्ये १७.५ टक्क्यांनी वाढ झालेली दिसून
येते.
म्युच्युअल फंडांच्या विविध योजनांमध्ये गुंतवणूक होत असली तरी गुंतवणुकीच्या प्रकारामध्ये मात्र बदल होतांना दिसत आहे. याआधी इक्विटी योजनांना अधिक प्रतिसाद मिळत होता. आता गुंतवणूकदारांचा ओढा डेट योजनांकडे सुरू झाला आहे.

च्आपल्या गुंतवणुकीला सुरक्षित ठेवत त्यापासून चांगला लाभ मिळविण्यासाठी ही रक्कम परस्पर निधींमध्ये गुंतविली जात आहे.
च्यामुळेच सन २०१४ मध्ये परस्पर निधींनी आणलेल्या विविध योजनांना गुंतवणूकदारांचा चांगला प्रतिसाद मिळालेला दिसून आला.
च्याचा परिणाम म्हणून या निधींच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ताही वाढली आहे.

शेअर बाजारात झालेल्या म्युच्युअल फंडांच्या युनिट खरेदी-विक्रीच्या व्यवहारांवर नजर टाकली असता काही ठळक बाबी समोर येतात. इक्विटी योजनांच्या बाबत वर्षाचे पहिले चार महिने अतिशय वाईट गेले. याकाळात सातत्याने मोठी विक्री झाली. त्यानंतर मात्र या योजनांना पुन्हा खरेदीदार मिळाले.

डेट फंडांमध्ये विक्रीपेक्षा खरेदी अधिक
कर्जरोख्यांशी संबंधित (डेट) फंडांमध्ये बाजारात केवळ जानेवारी महिन्यातच विक्री झाली. त्यानंतर मात्र या प्रकारामध्ये विक्रीपेक्षा खरेदीच अधिक झालेली दिसून आली. वर्षभरात सर्वच म्युच्युअल फंडांच्या व्यवस्थापनाखालील मालमत्तेमध्ये (एयूएम) वाढ झाली असली तरी काही फंड याला अपवाद आहेत. सहारा, आयआयएफएल, एस्कॉर्ट, पाईनब्रीज, पिअरलेस, बरोडा पायोनिअर आणि एलआयसी नोमुरा यांच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता घटली आहे.

Web Title: The investment increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.