मोदींच्या शपथविधीसाठी बंगालमधील हिंसेत मरण पावलेल्या कार्यकर्त्यांच्या नातलगांना आमंत्रण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 11:48 AM2019-05-29T11:48:46+5:302019-05-29T11:48:58+5:30
पश्चिम बंगालमध्ये राजकिय हिंसेतून हत्या झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या नातलगांचा यामध्ये समावेश आहे. या लोकांच्या राहण्याची आणि जेवनाची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
नवी दिल्ली - नरेंद्र मोदी देशाच्या पंतप्रधानपदी दुसऱ्यांदा विराजमान होणार आहे. मोदींच्या शपथविधी सोहळ्यासाठी जगभरातील नामवंत लोकांना आमंत्रित करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या सोहळ्यासाठी पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीदरम्यान ठार झालेल्या कार्यकर्त्यांच्या नातेवाईकांना देखील आमंत्रित करण्यात आले आहे.
पश्चिम बंगालमध्ये राजकिय हिंसेतून हत्या झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या नातलगांचा यामध्ये समावेश आहे. या लोकांच्या राहण्याची आणि जेवनाची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी बंगालमधील हिंसेत ठार झालेल्या मनू यांच्या मुलाने दिल्लीला जाण्यापूर्वी प्रतिक्रिया दिली. तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी माझ्या वडिलांना ठार केले. आम्हाला आनंद आहे की, आम्ही दिल्लीला जात आहोत. आता आमच्या परिसरात शांतता असल्याचे मनू यांच्या मुलाने सांगितले. मनू हे भाजपचे कार्यकर्ते होते.
Midnapore: Kin of BJP workers (who were killed in West Bengal in political violence) invited to the swearing-in ceremony of PM Narendra Modi. Son of Late Manu Hansda says,"My father was killed by TMC goons. We are happy that we are going to Delhi. There's peace in our area now." pic.twitter.com/P0uR6bBLXp
— ANI (@ANI) May 29, 2019
भाजपकडून ५४ कार्यकर्त्यांच्या नातलगांना शपथविधीसाठी बोलविण्यात आले आहे. बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मैदान तयार करण्यासाठी भाजपकडून प्रयत्न करण्यात येत असल्याचे बोलले जात आहे. शपथविधीसाठी १६ जून २०१३ ते २६ मे २०१९ या कालावधीत राजकीय वादातून मरण पावलेल्या कार्यकर्त्यांच्या नातलगांना बोलविण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० मे रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत.