कचरा जाळणे ठरतेय आजारास निमंत्रण
By admin | Published: February 22, 2016 12:02 AM2016-02-22T00:02:38+5:302016-02-22T00:02:38+5:30
जळगाव : शहरातील वेगवेगळ्या भागात उघड्यावर कचरा जाळणे धोकादायक ठरत असून यामुळे आजारास निमंत्रण मिळते. यामधून निघणारा धूर जीवघेणे गंभीर आजार होण्यास कारणीभूत ठरु शकतो, त्यामुळे उघड्यावर कचरा न जाळण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे.
Next
ज गाव : शहरातील वेगवेगळ्या भागात उघड्यावर कचरा जाळणे धोकादायक ठरत असून यामुळे आजारास निमंत्रण मिळते. यामधून निघणारा धूर जीवघेणे गंभीर आजार होण्यास कारणीभूत ठरु शकतो, त्यामुळे उघड्यावर कचरा न जाळण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे. शहरातील कचर्याची विल्हेवाट व्यवस्थित व्हावी म्हणून मनपाच्या वतीने शहरात वेगवेगळ्या भागात कचरा कुंड्या ठेवण्यात आल्या आहेत. असे असले तरी यामध्ये मनपा व काही नागरिकांच्याही चुका कचर्याच्या विल्हेवाटीस बाधा ठरतात. कचरा कुंड्या भरल्या तरी त्यामधील कचरा उचलला जात नाही तर दुसकीरकडे काही नागरिक कचरा कुंडीत न टाकता कुंडीच्या बाहेर टाकतात. त्यामुळे तो अस्ताव्यस्त पसरतो. या दोन्ही कारणांमुळे नागरिक हा कचरा उघड्यावरच जाळतात. त्यामुळे त्यातून मोठ्या प्रमाणात धूर निघतो, जो आरोग्यास हानीकारक आहे. सामान्य आजाराकडे दुर्लक्ष करु नका...कचरा जाळल्याने निघणार्या धुरामुळे सर्दी, डोके दुखणे, सतत नाक गळणे आणि सर्दीची ॲलर्जी असे आजार होतात. ते तसे सामान्य आजार वाटतात, मात्र त्याकडे दुर्लक्ष न करता तात्काळ उपचार करणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. दमा होण्याची शक्यता...सतत छातीमध्ये धूर गेल्याने श्वसनाचे आजार बळावतात. श्वसन क्रिया मंदावते, यामुळे सततचा खोकला, घशात खवखवणे असे घशाचेही आजार होतात. यामधून नंतर दमा सारखे गंभीर आजार होण्यास मदत मिळते. सोबतच अस्थमासारखेही आजार होतात, असे डॉक्टरांनी सांगितले. डोकेदुखी, डोळे जळजळणे...धुराच्या उग्र वासाने डोके भणभणते, यामुळे विचार करण्याची क्षमता कमी होते. तसेच डोळ्यात धूर गेल्याने डोळे चुळचुळ करतात. डोळ्यातून पाणी येते. हा धूर त्या परिसरातील घराघरात गेल्यावर त्याचा सर्वांना त्रास होऊन व तो घशावाटे पोटात गेल्याने पोटाचाही त्रास होतो. यामुळे वारंवार इन्फेक्शन होऊन आजारी पडण्याचे प्रमाण वाढते. ह्रदयावरील दाब वाढतो...कचर्यामधून निघणारा धूर नाका, तोंडावाटे पोटात, छातीत गेल्याने ह्रदयावरील दाब वाढतो. त्यामुळे त्याचा ह्रदयावर परिणाम होतो. तसेच फुफ्फुसाचाही आजार बळावतात. एकूणच उघड्यावर कचरा जाळल्याने साध्या आजारापासून गंभीर आजार होण्यास निमंत्रण मिळते. त्यामुळे उघड्यावर कचरा जाळणे धोकादायक ठरु शकते, म्हणून असे प्रकार टाळणेच योग्य असल्याचे सांगितले जात आहे. तसेच नागरिकांच्याही आरोग्याच्या दृष्टीने मनपा प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन कचर्याची व्यवस्थित विल्हेवाचट लावण्याची मागणी आहे.