सर्वांत शुभ सोहळा, राजकारण करू नये! प्राणप्रतिष्ठेसाठी शरद पवार, उद्धव ठाकरेंना निमंत्रण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2023 06:13 AM2023-12-29T06:13:14+5:302023-12-29T06:14:25+5:30
समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव, राजदचे लालूप्रसाद यादव, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही निमंत्रित केले आहे.
हरीश गुप्ता, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : अयोध्येत होणाऱ्या श्रीराम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला रामजन्मभूमी मंदिर न्यास व विश्व हिंदू परिषदेने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते उद्धव ठाकरे यांना निमंत्रित केले आहे.
याशिवाय समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव, राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही निमंत्रित केले आहे.
राजकारण नकाे : आलोक कुमार
सोहळ्यासाठी राजकीय पक्षांच्या सर्व प्रमुख नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. आम्ही कुणालाही टाळलेले नाही. सर्वांनी साेहळ्याला यावे. हा सर्वांत शुभ सोहळा आहे, त्यात राजकारण करू नये, असे विहिंपचे कार्याध्यक्ष आलोक कुमार यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
अयाेध्या विमानतळाला देणार महर्षि वाल्मीकी यांचे नाव
अयोध्या येथील विमानतळाला आता ‘महर्षी वाल्मीकी आंतरराष्ट्रीय विमानतळ, अयोध्याधाम’ असे नाव देण्यात येणार आहे. याआधी हा विमानतळ ‘मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम अयोध्या आंतरराष्ट्रीय विमानतळ’ या नावाने ओळखला जात होता.