ँपान १-महाराष्ट्र सदन- संपत्तीवर टाच

By admin | Published: September 2, 2015 11:31 PM2015-09-02T23:31:49+5:302015-09-02T23:31:49+5:30

Ipan 1-Maharashtra Sadan- The heel of wealth | ँपान १-महाराष्ट्र सदन- संपत्तीवर टाच

ँपान १-महाराष्ट्र सदन- संपत्तीवर टाच

Next
>महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात
चमणकर यांच्या संपत्तीवर टाच
मुंबई : महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी मुंबईतील चमणकर एंटरप्रायजेसच्या १७.३५ कोटींच्या संपत्तीवर टाच आणली आहे. यात फार्महाऊस, पाच फ्लॅट आणि मुदत ठेवींचा समावेश आहे. माजी मंत्री छगन भुजबळ यांच्याशी संबंधित असलेल्या या घोटाळ्याच्या संदर्भात संपत्तीवर टाच आणण्याची ही पहिली कारवाई आहे.
अंमलबजावणी संचानालयाने मनी लॉड्रींग प्रतिबंधक कायद्याखाली भुजबळांविरुद्ध दोन प्राथमिक तक्रार अहवाल नोंदविले आहेत. पहिले प्रकरण महाराष्ट्र सदन घोटाळा आणि कलिना जमीन वाटप प्रकरणाशी संबंधित असून दुसरे प्रकरण नवी मुंबईतील हाऊसिंग प्रोजेक्टशी संबंधित आहे.
महाकृष्णा, प्रणिता आणि प्रसन्न चमणकर यांच्या संपत्तीवर टाच आणण्याची ही या घोटाळ्याशी सबंधित पहिलीच कारवाई होय. प्राथमिक तक्रार अहवालात या तिघांची नावे नमूद करण्यात आलेली होती. चमणकर इंटरप्रायजेसने ओरिजन इन्फ्रास्ट्रक्चर या डमी कंपनीच्या खात्यात ७ डिसेंबर २००७ आणि ९ मे २०११ दरम्यान ३,६७,७१,६०१ रुपये जमा कले होते. मागच्या महिन्यात अंमलबजावणी संचानालायने राजेश मिस्त्रीच्या विलेपार्लेतील प्रभु कुटिरमधील फ्लॅटवर धाड टाकली होती. छगन भुजबळ यांना लाच देण्याची जबाबदारी चमणकर यांनी काही लोकांवर टाकली होती. त्यापैकी राजेश मिस्त्री एक आहे. पंकज आणि समीर भुजबळ संचालक असलेल्या कंपनीच्या खात्यात (निश इन्फ्रास्ट्रक्चर) मिस्त्रीने ४.५ कोटी रुपये जमा केले होते.
मिस्त्री हा एक व्यावसायिक असून उज्ज्वल काकरियाचा ग्राहक आहे. उज्ज्वलचे बंधू विपुल हे सुभाष कोटडिया यांच्या रॉयल इंटरप्रायजेसमध्ये भागीदार आहेत. भुजबळ यांना लाच देण्यासाठी प्राईम डेव्हलपर्सने याच कंपनीचा वापर केला. प्राइम डेव्हलपर्सने अंधेरीतील आरटीओ विभागाची जमीन विकसित करण्यासाठी चमणकर एंटरप्रायजेसकडून कंत्राट मिळविले होते.

Web Title: Ipan 1-Maharashtra Sadan- The heel of wealth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.