कौतुकास्पद! लहानपणी वडिलांना गमावलं आता मजूर आईची मुलगी झाली IPS; वाचा दिव्याची 'यशस्वी' कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2023 08:01 PM2023-01-27T20:01:17+5:302023-01-27T20:02:11+5:30

Success Story, IPS Divya Tanwar: आयपीएस दिव्या तन्वर यांनी मेहनतीच्या जोरावर यशाचे शिखर गाठले आहे. 

IPS Divya Tanwar has cleared the IPS exam in her first attempt and has become the Youngest IPS Officer   | कौतुकास्पद! लहानपणी वडिलांना गमावलं आता मजूर आईची मुलगी झाली IPS; वाचा दिव्याची 'यशस्वी' कहाणी

कौतुकास्पद! लहानपणी वडिलांना गमावलं आता मजूर आईची मुलगी झाली IPS; वाचा दिव्याची 'यशस्वी' कहाणी

googlenewsNext

नवी दिल्ली : दरवर्षी लाखो उमेदवार UPSC ची परीक्षा देतात. यापैकी मोजकेच लोक यशस्वी होतात आणि गुणवत्ता यादीत स्थान मिळवतात. त्यांच्यापैकी काही असे देखील असतात जे आपल्या आयुष्यातील सर्व अडचणींना तोंड देत या यशाच्या शिखरावर पोहोचतात. 2021 बॅचच्या IPS दिव्या तन्वर यांची गणना अशाच अधिकाऱ्यांमध्ये केली जाते. दिव्या तन्वर या हरयाणातील महेंद्रगड येथील रहिवासी आहेत.

त्यांच्या यशाची कहाणी UPSC ची परीक्षा देणाऱ्यांसाठी एक प्रेरणा आहे. खरं तर त्यांची आई कमी शिकलेली होती यात शंका नाही पण त्यांनी नेहमी आपल्या मुलीला अभ्यास करून पुढे जाण्याची प्रेरणा दिली. दिव्या यांनी यूपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी कोणतेही कोचिंग घेतले नव्हते. 

वडिलांच्या मृत्यूने बदललं जीवन 
IPS दिव्या तन्वर यांनी नवोदय विद्यालय महेंद्रगड येथून शालेय शिक्षण घेतले आहे. त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती. शालेय शिक्षणादरम्यान वडिलांचे निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबावर संकटांचा डोंगर कोसळला. दिव्या अभ्यासात हुशार होत्या आणि त्यामुळेच त्यांची आई बबिता तन्वर यांनी आपल्या मुलीच्या अभ्यासात कधीच अडथळा येऊ दिला नाही.

कॉलेजनंतर सुरू केली तयारी
दिव्या यांच्या आईने दिव्या, तनिषा आणि साहिल या तिन्ही मुलांना शिवणकाम आणि मजुरी करून स्वत:च्या पायावर उभे केले. दिव्या यांनी बीएससी उत्तीर्ण झाल्यानंतर यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. त्यांनी घरातील एका छोट्या खोलीत 10 तास अभ्यास करून नागरी सेवा परीक्षेची तयारी केली होती.

पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
IPS दिव्या तन्वर यांनी वयाच्या 21 व्या वर्षी (Youngest IPS Officer) 2021 मध्ये पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण केली. यामध्ये त्यांनी 438 वा क्रमांक मिळवून त्या आयपीएस अधिकारी बनल्या. दिव्या यांच्या अनेक मित्रांना आणि नातेवाईकांनाही माहिती नव्हते की त्या बंद खोलीत यूपीएससी परीक्षेची तयारी करत होत्या. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

Web Title: IPS Divya Tanwar has cleared the IPS exam in her first attempt and has become the Youngest IPS Officer  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.