अनोखी रेशीमगाठ! बालपणीची दोस्ती, एकत्र शिक्षण, नंतर लग्न; IPS पतीची 'बॉस' बनली DCP पत्नी!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2021 02:56 PM2021-08-25T14:56:49+5:302021-08-25T14:58:48+5:30

IPS Officer Success Story: अंकुर अग्रवाल आणि वृंदा शुक्ला यांची कहाणी एकदम फिल्मी आहे.

ips officer success story woman dcp vrinda shukla is boss of her ips husband ankur aggrawal | अनोखी रेशीमगाठ! बालपणीची दोस्ती, एकत्र शिक्षण, नंतर लग्न; IPS पतीची 'बॉस' बनली DCP पत्नी!

अनोखी रेशीमगाठ! बालपणीची दोस्ती, एकत्र शिक्षण, नंतर लग्न; IPS पतीची 'बॉस' बनली DCP पत्नी!

googlenewsNext

IPS Officer Success Story: घरात पत्नीच 'बॉस' असते असं म्हटलं जातं पण उत्तर प्रदेशच्या नोएडातील आयपीएस अधिकारी अंकुर अग्रवाल (Ankur Aggrawal) यांची पत्नी वृंदा शुक्ला (Vrinda Shukla) ऑफिसमध्येही त्यांची बॉस आहे. अंकुर अग्रवाल आणि वृंदा शुक्ला यांची कहाणी एकदम फिल्मी आहे. दोघांचीही बालपणीची दोस्ती आणि दोघांनीही शिक्षण देखील एकत्र पूर्ण केलं होतं. त्यानंतर दोघंही आयपीएस अधिकारी झाले आणि २०१९ साली दोघांनी लग्न करुन नव्या आयुष्याची सुरुवात केली. 

नोएडामध्ये दोघांचंही पोस्टींग
उत्तर प्रदेशच्या गौतम बुद्ध नगर जिल्ह्यातील पोलीस कमिश्नर प्रणाली लागू झाल्यानंतर वृंदा शुक्ला यांना गौतमबुद्ध नगरच्या पोलीस उपायुक्तपदी (DCP) नियुक्त करण्यात आलं. तर अंकुर अग्रवाल यांना अप्पर पोलीस उपायुक्तपदी (अतिरिक्त डीसीपी) नियुक्त करण्यात आलं होतं. 

दोघांनीही एकत्र शिक्षण केलं पूर्ण
आयएएनएसच्या माहितीनुसार अंकुर अग्रवाल आणि वृंदा शुक्ला हे दोघंही हरियाणातील अंबाला येथील रहिवासी आहेत. दोघांही एकमेकांच्या शेजारीच राहत होते. वृंदा यांनी अंबाला कॉन्वेंट जीसस मेरी हायस्कूलमध्ये इयत्ता १० वी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्या अमेरिकेत होत्या. तर अंकुर यांनी भारतातच राहून इंजिनिअरिंगपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. 

दोघांची अशी झाली भेट
शिक्षण पूर्ण केल्यानंतर वृंदा शुक्ला अमेरिकेत नोकरी करत होत्या. तर अंकुर अग्रवाल इंजिनिअरिंगनंतर बंगळुरु स्थित एका कंपनीत नोकरी करत होते. एक वर्ष बंगळुरुत नोकरी केल्यानंतर अंकुर देखील अमेरिकेत गेले आणि दोघांची योगायोगानं भेट झाली. 

अमेरिकेत केली यूपीएससीची तयारी
अमेरिकेत नोकरी करतानाच अंकुर अग्रवाल आणि वृंदा शुक्ला यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली होती. त्यानंतर २०१४ साली वृंदा यांना दुसऱ्याच प्रयत्नात सिविल सर्व्हीस परीक्षेत यश प्राप्त झालं. त्यानंतर त्या आयपीएस अधिकारी बनल्या आणि त्यांना नागालँड कॅडर मिळालं. त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजेच २०१६ साली अंकुर आपल्या पहिल्याच प्रयत्नात प्रशासकीय परीक्षेत उत्तीर्ण झाले आणि आयपीएस अधिकारी बनले. त्यांना बिहार कॅडर मिळालं. 

२०१९ मध्ये विवाह
बालपणीच्या मैत्रीचं रुपांतर नंतर प्रेमात झालं आणि दोघांनीही २०१९ साली लग्न करण्याचा निर्णय घेतला. फेब्रुवारी २०१९ मध्ये दोघंही लग्नबंधनात अडकले. 

Web Title: ips officer success story woman dcp vrinda shukla is boss of her ips husband ankur aggrawal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.