केंद्राने भाकरी फिरवली! रवी सिन्हा रॉचे नवे प्रमुख; महाराष्ट्राची संधी थोडक्यात हुकलेली
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 03:44 PM2023-06-19T15:44:28+5:302023-06-19T15:45:15+5:30
सिन्हा यांची दोन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. गोयल यांना सरकारने अनेकदा वाढ दिली होती.
भारताची गुप्तचर यंत्रणा रॉमध्ये खांदेपालट होणार आहे. केंद्र सरकारने सध्याचे रॉ प्रमुख समंत कुमार गोयल यांचा कार्यकाळ वाढविण्यास नकार दिला आहे. त्यांच्याजागी आयपीएस अधिकारी रवी सिन्हा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सिन्हा यांची दोन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. गोयल यांना सरकारने अनेकदा वाढ दिली होती. आता त्यांचा कार्यकाळ ३० जूनला संपणार आहे. सिन्हा हे 1988 च्या छत्तीसगढ बॅचचे अधिकारी आहेत. केंद्र सरकारने सोमवारी त्यांच्या नियुक्तीची घोषणा केली.
सिन्हा हे सध्या कॅबिनेट सचिवालयात प्रिंसिपल स्टाफ ऑफिसर आहेत. ही पोस्ट स्पेशल सेक्रेटरी रँकची आहे. त्यांची पुढील पोस्टिंग देशाच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्वाची असलेल्या रॉ च्या प्रमुख पदी असणार आहे.
गेल्या वर्षीच समंत कुमार गोयल यांचा कार्यकाळ संपणार होता. त्यांच्याजागी महाराष्ट्र केडरचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी सुबोध कुमार जैसवाल यांची नियुक्ती होण्याचे जवळपास निश्चित झाले होते. परंतू केंद्राने गोयल यांचा कार्यकाळ वाढविला होता.