6 नोकऱ्या सोडून पेंटरची मुलगी झाली IPS, मंत्र्याशी घेतला होता पंगा; कोण आहे ही अधिकारी?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2023 01:03 PM2023-04-12T13:03:05+5:302023-04-12T13:04:21+5:30
एसपी असताना त्या एका भाजपाच्या मंत्र्याशी भिडल्या होत्या. सध्या त्या रेल्वेत एसपी पदावर आहेत.
हरियाणा कॅडरच्या एका महिला आयपीएसची गणना तडफदार पोलीस अधिकाऱ्यांमध्ये केली जाते. एसपी असताना त्या एका भाजपाच्या मंत्र्याशी भिडल्या होत्या. सध्या त्या रेल्वेत एसपी पदावर आहेत. संगीत कालिया असं या महिला अधिकाऱ्याचं नाव आहे. मूळच्या हरियाणाच्या भिवानी जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या IPS संगीता कालिया यांचा जन्म 15 जानेवारी 1987 रोजी झाला. त्यांचे वडील पोलीस खात्यात पेंटर होते.
संगीता कालिया यांनी 6 नोकऱ्या सोडल्या आणि IPS होण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. एसपी पदावर असताना हरियाणाचे मंत्री अनिल विज यांच्याशी त्या भिडल्या होत्या. त्यानंतर त्यांची बदली झाली. संगीता कालिया यांनी हरियाणातील एका खासगी शाळेतून शालेय शिक्षण घेतले. यानंतर त्यांनी अशोका विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली. पदव्युत्तर शिक्षण पूर्ण होण्याआधी, वडील सेवेतून निवृत्त होण्याआधी स्वत:ला सक्षम बनवावे, असे संगीता यांना वाटले.
मुलीने अधिकारी व्हावे, अशी त्यांच्या वडिलांचीही इच्छा होती. संगीता कालिया पहिल्यांदाच UPSC नागरी सेवा परीक्षेत नापास झाल्या. दुसऱ्यांदा ती क्रॅक करण्यात यशस्वी झाल्या. पण आयआरएस केडर मिळाले. जे त्यांना आवडले नाही. तिसऱ्यांदा यूपीएससीची परीक्षा दिली आणि आयपीएस कॅडर मिळवले.
IPS संगीता कालिया 27 नोव्हेंबर 2018 रोजी हरियाणाचे आरोग्य मंत्री अनिल विज यांच्यासोबत फतेहाबाद येथे भिडल्या होत्या. एका तक्रारीच्या सुनावणीदरम्यान अनिल विज यांनी कालिया यांना बाहेर जाण्यास सांगितले. पण कालिया बाहेर न गेल्याने विज यांना सभा सोडावी लागली. त्यानंतर कालिया यांची बदली झाली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"