IPS सुधाकर पठारे यांचे भीषण अपघातात निधन; महाराष्ट्र पोलिस दलावर शोककळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 17:46 IST2025-03-29T17:46:02+5:302025-03-29T17:46:31+5:30

या अपघातात परभणी येथील कंत्राटदार भागवत खोडके यांचाही मृत्यू झाला आहे.

IPS Sudhakar Pathare dies in a horrific accident Maharashtra Police | IPS सुधाकर पठारे यांचे भीषण अपघातात निधन; महाराष्ट्र पोलिस दलावर शोककळा

IPS सुधाकर पठारे यांचे भीषण अपघातात निधन; महाराष्ट्र पोलिस दलावर शोककळा

IPS Sudhakar Pathare Accident : तेलंगणातील श्रीशैलम येथून नागरकुरलूनकडे जात असताना आयपीएस सुधाकर पठारे यांचे अपघाती निधन झालं आहे. देवदर्शनासाठी गेले असता पठारे यांच्या कारचा अपघात झाला आणि त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात परभणी येथील कंत्राटदार भागवत खोडके यांचाही मृत्यू झाला आहे. हे दोघे ज्या गाडीतून प्रवास करत होते त्या गाडीची ट्रकसोबत धडक झाली आणि हा अपघात झाला. सुधाकर पठारे हे २०११ बॅचचे आयपीएस अधिकारी असून पठारे यांच्या निधनाने महाराष्ट्र पोलिस दलावर शोककळा पसरली आहे. 

आयपीएस सुधाकर पठारे यांच्यावर सध्या मुंबई पोलिसात पोर्ट झोनचे डीसीपी म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली होती. पठारे हे काही काळापूर्वी ट्रेनिंगसाठी हैदराबादमध्ये गेले होते. तिथं त्यांच्या एका नातेवाईकासह ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी जात असताना हा अपघात झाला. अपघातात सुधाकर पठारे यांच्यासोबत त्यांचे नातेवाईक असलेल्या भागवत खोडके यांचाही मृत्यू झाला.  

सुधाकर पठारे यांची कारकीर्द

सुधाकर पठार हे स्पर्धा परीक्षा देत असताना १९९५ साली जिल्हा विशेष लेखा परीक्षक झाले. यानंतर १९९६ मध्ये विक्रीकर अधिकारी वर्ग म्हणून त्यांची निवड झाली. तसंच नंतर १९९८ साली पोलिस उपअधीक्षक म्हणून त्यांची निवड झाल्यानंतर पोलिस खात्यातच ते रमले. आतापर्यंत त्यांनी पोलिस उपअधीक्षक म्हणून पंढरपूर, अकलूज, कोल्हापूर शहर, राजुरा येथे काम केले आहे.

Web Title: IPS Sudhakar Pathare dies in a horrific accident Maharashtra Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.