1 एप्रिलपासून रेल्वे तिकिटाच्या PNRमध्ये मोठा बदल, असा होणार फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2019 08:51 AM2019-03-14T08:51:51+5:302019-03-14T08:58:28+5:30

भारतीय रेल्वे 1 एप्रिलपासून प्रवाशांना नवी सुविधा देणार आहे.

irctc indian railway change pnr rule from 1 april 2019 | 1 एप्रिलपासून रेल्वे तिकिटाच्या PNRमध्ये मोठा बदल, असा होणार फायदा

1 एप्रिलपासून रेल्वे तिकिटाच्या PNRमध्ये मोठा बदल, असा होणार फायदा

googlenewsNext

नवी दिल्लीः भारतीय रेल्वे 1 एप्रिलपासून प्रवाशांना नवी सुविधा देणार आहे. विमान कंपन्यांसारखीच रेल्वेही आता एकामागाहून येणाऱ्या दुसऱ्या ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी पॅसेंजर नेम रेकॉर्ड(PNR) जारी करणार आहे. या नियमानुसार पहिल्या ट्रेनला उशीर झाल्यामुळे पुढची ट्रेनही सुटण्यास वेळ लागल्यास कोणतंही शुल्क न आकारता प्रवास रद्द करण्याचा प्रवाशाला अधिकार मिळणार आहे. हा नियम रेल्वेच्या सर्वच वर्गांसाठी लागू आहे. 

दुसऱ्या ट्रेनचं रिफंड मिळणार
जेव्हा आपण ट्रेनचं तिकीट बुक करता, त्यावेळी एक पीएनआर नंबर मिळतो. हा PNR एक युनिक कोड असतो, ज्यामुळे आपल्याला ट्रेन आणि त्या संबंधीची सर्व माहिती मिळते. जर तुम्ही दोन ट्रेनच्या तिकीट बुक केल्या असल्यास दोन पीएनआर नंबर जनरेट होतात. भारतीय रेल्वेनं नियमांत बदल करून 2 पीएनआरला लिंक करण्यास सहजसोपं केलं आहे. मग आपण तिकीट ऑनलाइन किंवा काऊंटरवरून बुक करा. कोणत्याही पद्धतीत तिकीट खरेदी केल्यानंतर प्रवाशाला सहज रिफंड मिळणार आहे. 

रिफंडचे नियम
- दोन्ही तिकिटांवर प्रवाशाची माहिती एकासारखीच असावी. 
- हा नियम सर्व प्रवाशांना लागू आहे. 
- ज्या स्टेशनवर पहिली ट्रेन पोहोचली आहे आणि ज्या स्टेशनवरून दुसरी ट्रेन पकडायची आहे, त्यां दोन्ही ट्रेनचं स्टेशन एकच असायला हवं. 

रिफंडचे नवे नियम
- जर कोणत्याही स्टेशनवर रिफंड न मिळाल्यास आपण भरलेला टीडीआर 3 दिवसांपर्यंत मान्य राहील. आपल्या रिफंडचे पूर्ण पैसे आपल्याला सीसीएम किंवा रिफंड ऑफिसमधून मिळतील. 
- जर आपण काऊंटरवरून रिझर्व्हेशनचं तिकीट घेतलं असेल, तर पहिली ट्रेन येण्यापूर्वीच्या 3 तासांमध्ये आपण दुसऱ्या ट्रेनचं तिकीट रद्द करू शकतो. रिफंडचे पैसे काऊंटरवरच मिळतील. 
- जर तिकीट ऑनलाइन बुक केली असेल, तर ज्या स्टेशनवर पहिली ट्रेन पोहोचली आहे आणि ज्या स्टेशनवरून दुसरी ट्रेन पकडायची आहे, त्याच स्टेशनवर टीडीआर भरावा लागणार आहे. 
- पहिली ट्रेन उशिरानं असल्यास कारण देत दुसऱ्या ट्रेनला सुटण्यास वेळ लागत असल्याचं कारण दिल्यासच आपल्याला रिफंड मिळणार आहे. 
 

Web Title: irctc indian railway change pnr rule from 1 april 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.