खूशखबर! आयआरसीटीसीवरून तिकीट बुकिंगसाठी 15 मिनिटे जास्त मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2018 12:17 PM2018-11-13T12:17:07+5:302018-11-13T20:21:39+5:30
आयआरसीटीसीच्या वेबसाइट किंवा अॅपवरून ई तिकिटे बुक करणाऱ्या प्रवाशांसाठी खूशखबर आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी आयआरसीटीसीने तिकीट बुकिंग प्रक्रियेत बदल केला असून ग्राहकांना तिकीट बुकिंगसाठी 15 मिनिटांचा जास्त वेळ मिळणार आहे.
नवी दिल्ली - रेल्वे प्रवाशांना योग्य सोयीसुविधा मिळाव्या यासाठी इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशनने (आयआरसीटीसी) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आयआरसीटीसीच्या वेबसाईट किंवा अॅपवरून ई तिकिटे बुक करणाऱ्या प्रवाशांसाठी खूशखबर आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी आयआरसीटीसीकडून तिकीट बुकिंग प्रक्रियेत बदल केला असून ग्राहकांना तिकीट बुकिंगसाठी 15 मिनिटांचा जास्त वेळ मिळणार आहे.
आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर याआधी रात्री 11.30 वाजेपर्यंत तिकीट बुकिंगची सोय होती. त्यानंतर 11.30 ते 12 पर्यंत हे तिकीट बुकींग बंद करण्यात येत असे. जुन्या व्यवस्थेनुसार आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर मुख्य सर्व्हर आधी एक तास बंद असायचा; पण आता हा सर्व्हर केवळ 45 मिनिटे बंद असणार आहे. म्हणजेच 11.45 वाजेपर्यंत प्रवाशांना तिकीट बुकिंग करता येणार आहे. प्रवाशांना तिकीट बुकिंगसाठी 15 मिनिटांचा जास्त वेळ मिळणार आहे.
ई तिकीटिंग व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी नुकतेच आयआरसीटीसीने सिंगापूरहून पाच नवीन सर्व्हर मागवले आहेत. याआधी आयआरसीटीसी वेबसाईटवर तिकीट बुक करण्याची क्षमता आधीपेक्षा वाढवण्यासाठी अनेक उपाय योजना करण्यात आल्या आहेत. आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर दिवसाला साधारण सहा लाख तिकीट बुक केल्या जातात. त्यामुळे प्रवाशांना तिकीट बुकिंगसाठी 15 मिनिटांचा जास्त वेळ मिळणार असल्याने सोयीचे होणार आहे.