ट्रेनला उशीर झाल्यास प्रवाशांना मिळणार IRCTC कडून मोफत जेवण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2018 01:13 PM2018-06-19T13:13:40+5:302018-06-19T13:13:40+5:30

तुम्ही आरक्षित तिकिटावर प्रवास करत असाल आणि तुमची ट्रेन पाच ते सहा तास उशिराने धावत असेल तर तुम्हाला भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन निगम (IRCTC) कडून जेवण मोफत मिळणार आहे. 

irctc to offer free food for delayed trains | ट्रेनला उशीर झाल्यास प्रवाशांना मिळणार IRCTC कडून मोफत जेवण

ट्रेनला उशीर झाल्यास प्रवाशांना मिळणार IRCTC कडून मोफत जेवण

Next
ठळक मुद्देट्रेनला उशीर झाल्यास प्रवाशांना मिळणार मोफत जेवणभारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन निगम (IRCTC) कडून मिळणार आरक्षित प्रवाशांची खाण्यापिण्याची गैरसोय होऊ नये म्हणून निर्णय

नवी दिल्ली : रेल्वेने प्रवास करणा-यांसाठी एक खूशखबर आहे. जर, तुम्ही आरक्षित तिकिटावर प्रवास करत असाल आणि तुमची ट्रेन पाच ते सहा तास उशिराने धावत असेल तर तुम्हाला भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन निगम (IRCTC) कडून जेवण मोफत मिळणार आहे. 

रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी यासंदर्भात मीडियाशी चर्चा केली. यावेळी ते म्हणाले की, सध्या रेल्वे ट्रॅकच्या दुरुस्तीचे कामकाज सुरु आहे. हे काम खासकरुन रविवारच्या दिवशी सुरु आहे. त्यामुळे लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांना उशिर होत आहे. अशा परिस्थितीत ट्रेनमध्ये असणा-या आरक्षित प्रवाशांची खाण्यापिण्याची गैरसोय होऊ नये, यासाठी त्यांना भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन निगम (IRCTC) कडून जेवण उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यासोबतच, विनाआरक्षित तिकिट काढून प्रवास करणा-या नागरिकांंसाठी सुद्धा आम्ही मोफत जेवण देण्याचा विचार करत आहोत, असे रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले. 

येत्या 15 ऑगस्टला रेल्वेचे नवीन वेळापत्रक आणले जाणार आहे. त्यामध्ये प्रवाशांना रेल्वे ट्रॅकवर चालणा-या नियोजित कामकाजामुळे उशीर होणा-या रेल्वेगाड्यांची माहिती दिली जाणार आहे, असेही पीयूष गोयल म्हणाले.

बिल न दिल्यास जेवण मोफत
रेल्वेत महागडे जेवण विकून प्रवाशांना त्याचे बिल न देणाऱ्या कंत्राटदारांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश गेल्या काही दिवसांपूर्वी रेल्वे मंत्रालयाने संबंधित विभागांना दिले आहेत. यामुळे प्रवाशाने जेवणाचे बिल मागितल्यास ते कंत्राटदाराला द्यावेच लागणार आहे. अन्यथा त्याला पैसे देऊ नका असे निर्देश रेल्वेने प्रवाशांना दिले आहेत. 31 मार्च 2018 पासून रेल्वेने हे नवीन नियम लागू केले आहेत. 
 

Web Title: irctc to offer free food for delayed trains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.