इरोम शर्मिला यांची लगीनघाई

By admin | Published: July 13, 2017 11:41 AM2017-07-13T11:41:30+5:302017-07-13T11:44:25+5:30

मानवाधिकार कार्यकर्त्या इरोम शर्मिला लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत.

Irom Sharmila's Sparkline | इरोम शर्मिला यांची लगीनघाई

इरोम शर्मिला यांची लगीनघाई

Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 13 - ईशान्य भारतातील नागरिकांचे मूलभूत अधिकार आणि तेथे तैनात लष्कराला विशेषाधिकार देणारा कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी तब्बल सोळा वर्षे संघर्ष करणाऱ्या इरोम या साऱ्या जगाला परिचित आहेत. त्यांच्याबद्दलची गोड बातमी समोर आली आहे. मानवाधिकार कार्यकर्त्या इरोम शर्मिला लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत. 16 वर्षे उपोषण करून मणिपूरच्या लोकांसाठी संघर्ष करणा-या इरोम यांनी ब्रिटिश नागरिक डेसमंड कॉटन्हो यांच्याशी विवाह करण्याचा निर्णय घेतला आहे. 
 
बुधवारी ( 12 जुलै ) इरोमनं लग्नासाठी आवश्यक असलेली कागदपत्रं कोडाईकनालमधील सब रजिस्ट्रार कार्यालयात जमा केली आहेत. द हिंदूनं दिलेल्या वृत्तानुसार, इरोमला रजिस्ट्रार कार्यालयात आपल्या लग्नासाठीच्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी जवळपास 2 तास लागले.  कदाचित इरोम व डेसमंडला लग्नासाठी आणखी काळ प्रतीक्षा करावी लागणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, सब रजिस्ट्रार राजेश यांनी सांगितले की, इरोम व डेसमंड यांना लगेचच लग्न करण्यासाठी परवानगी देऊ शकत नाही. यामागे आंतरजातीय विवाह असल्याचे कारण त्यांनी सांगितले. राजेश यांनी सांगितले की, कायद्यानुसार आंतरजातीय विवाह हिंदू विवाह कायद्यांर्तगत होऊ शकत नाही. लग्नासाठी दोघांना विशेष विवाह कायदा अंतर्गत नोंदणी करावी लागेल.  यासाठी 30 दिवसांपर्यंत वेळ लागेल. 
 
लग्न नोंदणीच्या तारखेसंबंध पोलिसांनीही माहिती मागवली आहे. पोलीस इरोमवर ब-याच कालावधीपासून नजर ठेऊन आहेत. 
इरोम यांनी १६ वर्षे उपोषण करून मणिपूरच्या लोकांसाठी संघर्ष केला. त्यानंतर त्यांनी राजकीय पक्ष स्थापन केला; मात्र गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना केवळ आठ मते मिळाली होती, त्यामुळे नाराज इरोम यांनी राजकारणातून निवृत्त होण्याचा मनोदय बोलून दाखविला होता.  
 
विवाहाबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, मी विवाहाबाबत आई आणि अन्य कुटुंबीयांना कळवले आहे. विवाहानंतरही आपण लोकांसाठी लढत राहणार असून, पक्ष बळकट करण्याचाही निर्धार आहे. विवाहानंतरच्या जीवनाबाबत विचारले असता त्या म्हणाल्या की, विवाहानंतर आपण तामिळनाडूत राहणार आहोत.
 
डेसमंड ब्रिटिश वंशाचे आहेत. त्याबाबत त्या म्हणाल्या की, आपले पती विवाहानंतर भारतीय व्हिसा घेऊन भारतात राहतील. डेसमंड यांचे कुटुंबीय गोव्याशी संबंधित होते. डेसमंड यांचा जन्म टांझानियात झाला. नंतर त्यांनी ब्रिटिश नागरिकत्व घेतले.
 
आणखी बातम्या वाचा
(इरोम लग्नबेडीत अडकणार)
(इरोम शर्मिला यांनी संरक्षण नाकारले)
(इरोम शर्मिला यांचा पराभव)
दरम्यान, मणिपूरच्या ‘आयर्न लेडी’ इरोम शर्मिला निवडणूक रिंगणात अपयशी ठरल्या. गेल्या वर्षी त्यांनी अचानक आपले बेमुदत उपोषण मागे घेऊन निवडणूक लढविण्याचा निर्णय जाहीर केला तेव्हा अनेकांना आश्चर्य वाटले होते. लोकशाही पद्धतीने निवडणुकीच्या रिंगणात उतरून आपला हा लढा पूर्णत्वास नेण्याचा निर्धार त्यांनी केला होता. इरोम यांनी स्थापन केलेल्या पीपल्स रिसर्जेंस अ‍ॅण्ड जस्टिस अलायन्सने (पीआरजेए) आपले तीन उमेदवार निवडणुकीत उभे केले होते. या तिघांनाही पराभवाचा सामना करावा लागला होता. खुद्द इरोम यांना केवळ ९० मते पडली.  त्यामुळेच त्यांनी यापुढे कधीही निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर केले. 
 
 

Web Title: Irom Sharmila's Sparkline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.