राजगिरा चिक्कीत लोखंडाचा तुकडा
By admin | Published: July 3, 2015 11:00 PM2015-07-03T23:00:09+5:302015-07-03T23:00:09+5:30
फोटो : ०३एएमपीएच३४
Next
फ टो : ०३एएमपीएच३४़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़राजगिरा चिक्कीत लोखंडाचा तुकडासंतोष शेंडे/टाकरखेडा संभू (अमरावती) : शासनामार्फत राज्यातील अंगणवाड्यांना पुरविण्यात येणार्या राजगिर्याच्या चिक्कीत लोखंडाचा तुकडा आढळून आला. ही संतापजनक घटना भातकुली तालुक्यातील टाकरखेडा संभू येथे शुक्रवारी उघडकीस आली. टाकरखेडा संभू येथे एकूण चार अंगणवाड्या आहेत. त्यापैकी अंगणवाडी क्र.४ मध्ये शासनाकडून पुरविण्यात आलेल्या शालेय पोषण आहारात चिक्कीचे पोते आले होते. एका पोत्यात १२९ नगाप्रमाणे ५७६ नग चिक्की होती. या चिक्कीचे वाटप करण्यासाठी अंगणवाडीत सरपंच चंद्रशेखर गेडाम, सदस्य शरद मोहोड ही मंडळीसुध्दा दाखल झाली होती. चिक्कीचा एक तुकडा काढताच त्यात लोखंडाचा तुकडा आढळून आला. याची माहिती सर्वप्रथम वैद्यकीय अधिकारी राजेंद्र दाळू, बालविकास प्रकल्पाच्या अर्चना काळे, आरोग्य सहकारी गुल्हाने, तालुका आरोग्य अधिकारी सिरसाट, बालविकास अधिकारी धारगे यांना देण्यात आली. लगेच सर्व अधिकारी टाकरखेडा संभू येथील अंगणवाडी केंद्रात दाखल झाले. बालकांसाठी पाठविलेल्या शालेय पोषण आहारात लोखंडाचा तुकडा निघाल्याने पालक संतप्त झाले आहेत. ़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़कोटशासनामार्फत पुरविण्यात आलेल्या राजगिर्याच्या चिक्कीत पीन आढळून आली. पोषण आहाराचे वाटप सुुरू असताना सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी आणि महिलांचीही यावेळी उपस्थिती होती. पीन दिसताक्षणी लाभार्थ्यांना चिक्कीचे वाटप बंद करण्यात आले असून सर्व मालाला सील लावण्यात आले. - कैलास घोडके, महिला व बालकल्याण अधिकारी, अमरावती.