अरे व्वा! इंजिनिअरिंगमध्ये मजा आली नाही, आता झाली अधिकारी; दोनदा क्लियर केली UPSC
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2023 12:02 PM2023-09-25T12:02:15+5:302023-09-25T12:03:03+5:30
इंजिनिअरिंगमध्ये करिअर करण्याऐवजी तिने यूपीएससी पास करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी तिने कॅम्पस प्लेसमेंटही सोडली.
अनेकदा दहावी, बारावीनंतर विद्यार्थी इंजिनिअर किंवा डॉक्टर होण्याची स्वप्ने पाहू लागतात. मात्र UPSC उत्तीर्ण होणं हे खूप कठीण मानलं जातं, परंतु काही हुशार लोक आहेत जे इंजिनिअरिंग करिअर सोडून UPSC पास करतात. यामध्ये आयआरएस अधिकारी आरुषी शर्माचा समावेश आहे. आरुषी शर्मा ही मेरठची रहिवासी आहे. तिचे शालेय शिक्षण दिल्लीतून पूर्ण झाले आहे. शालेय शिक्षणानंतर बी.टेक केलं पण इंजिनिअरिंगमध्ये तिला मजा आली नाही.
इंजिनिअरिंगमध्ये करिअर करण्याऐवजी तिने यूपीएससी पास करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी तिने कॅम्पस प्लेसमेंटही सोडली. वेगळे काहीतरी करावं असं आरुषीला वाटलं. UPSC पास करण्याचं स्वप्न घेऊन ती दिल्लीत आली. तिने यूपीएससीचा अभ्यासक्रम चांगल्या प्रकारे समजून घेतला आणि रात्रंदिवस तयारी केली. यूपीएससी उत्तीर्ण होण्यासाठी सेल्फ स्टडीचा मार्ग निवडला. कठोर परिश्रम केले आणि स्वतःला सोशल मीडिया आणि मित्रांपासून दूर ठेवलं.
सुरुवातीला तिला अपयशाचा सामना करावा लागला. पण लवकरच तिची मेहनत फळाला आली आणि 2021 मध्ये तिची निवड झाली. तिला आयआयएस म्हणजेच इंडियन इन्फॉर्मेशन सर्विसेज मिळाली. पण आरुषी समाधानी नव्हती. तिचा हा पहिलाच प्रयत्न होता. तिचा उत्साह वाढला. पुढच्या वर्षी म्हणजे UPSC 2022 मध्ये ती पुन्हा बसली.
यावेळी तिची रँक 402 होती. तिला इंडियन रेवन्यू सर्विसेज (IRS) मिळाली. शालेय जीवनापासूनच आरुषीला नवीन गोष्टी शिकण्यात आणि काहीतरी नवीन करण्याची आवड आहे. ती सध्या मुंबईत आयआरएस अधिकारी म्हणून तैनात आहेत. सोशल मीडियावरही तो खूप सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर त्याचे 69 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.