आयआरएस अधिकाऱ्याच्या घरात घबाड सापडलं, बीएमडब्ल्यू, मर्सिडीज कार, रोलेक्स घड्याळे सापडली; CBIने लाचखोरीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 10:53 IST2024-12-19T10:45:29+5:302024-12-19T10:53:03+5:30

सीबीआयने सह विकास आयुक्त सीपीएस चौहान आणि उपविकास आयुक्त प्रसाद वरवंतकर या दोन आयआरएस अधिकाऱ्यांसह दोन सहाय्यक विकास आयुक्त आणि इतर पाच जणांना पैशाच्या बदल्यात काही मध्यस्थांना मदत केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे.

IRS officer's house ransacked, BMW, Mercedes cars, Rolex watches found; CBI busts bribery racket | आयआरएस अधिकाऱ्याच्या घरात घबाड सापडलं, बीएमडब्ल्यू, मर्सिडीज कार, रोलेक्स घड्याळे सापडली; CBIने लाचखोरीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला

आयआरएस अधिकाऱ्याच्या घरात घबाड सापडलं, बीएमडब्ल्यू, मर्सिडीज कार, रोलेक्स घड्याळे सापडली; CBIने लाचखोरीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला

सीबीआयने लाचखोरी प्रकरणी दोन आयआरएस अधिकाऱ्यांसह ७ जणांवर कारवाई केली आहे. या काळात एका अधिकाऱ्याच्या घरीही तपासणी करण्यात आली. तपासादरम्यान सीबीआय अधिकाऱ्यांना महागड्या आलिशान कार, घड्याळांसह अनेक मौल्यवान वस्तू सापडल्याचं वृत्त आहे. या अधिकाऱ्यांची मुंबईतील सांताक्रूझ इलेक्ट्रॉनिक्स एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन येथे नियुक्ती करण्यात आली होती.

कुलगाम इथं दहशतवादी अन् सैन्य दलात मोठी चकमक; ५ दहशतवादी ठार, सर्च ऑपरेशन सुरू

सीबीआयने दोन आयआरएस अधिकारी - सह विकास आयुक्त सीपीएस चौहान आणि उपविकास आयुक्त प्रसाद वरवंतकर, दोन सहाय्यक विकास आयुक्तांसह आणि इतर पाच जणांना पैशाच्या बदल्यात काही मध्यस्थांना मदत केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे, अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले. ते म्हणाले की, अटक केलेल्या व्यक्तींच्या परिसराची झडती आणि संयुक्त आकस्मिक तपासणी दरम्यान, सीबीआयने सुमारे १.२० कोटी रुपये रोख आणि कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेची कागदपत्रे जप्त केली.

मिळालेल्या माहितीनुसार, वरिष्ठ आयआरएस अधिकारी चौहान यांच्या घरातून बीएमडब्ल्यू आणि मर्सिडीज कार, रोलेक्स आणि राडोसारख्या मोठ्या ब्रँडची घड्याळे सापडली आहेत. चौहान आणि इतर अधिकारी लाचखोरीत सामील असल्याचे सीबीआयच्या तपासात समोर आले आहे. जागा वाटप, आयात मालाची विल्हेवाट लावणे आणि कंत्राटदारांकडून मंजुरी घेणे या कामांच्या बदल्यात हे अधिकारी लाच घेतात.

१७ डिसेंबर रोजी SEEPZ कार्यालयात अचानक तपासणी झाली. अहवालानुसार, यावेळी अधिकाऱ्यांना मनोज जोगळेकर नावाचा एक व्यक्ती सापडला, त्या अधिकाऱ्याने कबूल केले आहे की, तो वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी लाच घेत असे आणि लाचेची रक्कम त्याच्या कार्यालयात ठेवली जात होती.

अहवालानुसार, जोगळेकर यांनी अधिकाऱ्यांना नाव किंवा कोड लिहिलेल्या अनेक पिशव्या दाखवल्या. अंदाजे ६० लाख रुपयांची रोकड असल्याचे सांगण्यात येत आहे. सीपीएस चौहान, डीडीसी डॉ प्रसाद वरवंतकर आणि सीपझेडच्या इतर अधिकाऱ्यांसाठी तो लाच घेत असे त्याने उघड केले आहे.

तपासादरम्यान अनेक लिफाफे सापडले. यामध्ये 'SM, RR, AC, DDC' असे कोड लिहिलेले होते. आरआर नावाच्या पाकिटात ६३ हजार ५०० रुपये होते.

Web Title: IRS officer's house ransacked, BMW, Mercedes cars, Rolex watches found; CBI busts bribery racket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.