निरोगी शरीर महत्त्वाचे की आर्थिक नियोजन?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2024 06:12 AM2024-02-08T06:12:28+5:302024-02-08T06:13:05+5:30

अमेक्स ट्रेंडेक्सने मंगळवारी जारी केलेल्या अहवालातून ही बाब समोर आली आहे

Is a healthy body more important than financial planning? | निरोगी शरीर महत्त्वाचे की आर्थिक नियोजन?

निरोगी शरीर महत्त्वाचे की आर्थिक नियोजन?

नवी दिल्ली : निरोगी आयुष्य सर्वांना हवे असे वाटत असते, परंतु कोरोनानंतर याचे महत्त्व अधोरेखित झाले. त्यामुळे स्वस्थपणे जगता यावे यासाठी सर्वजण विशेष प्रयत्न करू लागले. देशात नागरिक शारीरिक स्वास्थ्य, मानसिक स्वास्थ्य आणि योग्य आर्थिक नियोजन या बाबींना सर्वाधिक प्राधान्य देतात, असे दिसून आले आहे. अमेक्स ट्रेंडेक्सने मंगळवारी जारी केलेल्या अहवालातून ही बाब समोर आली आहे.

पाहणीत किती जणांचा सहभाग?

n६ डिसेंबर ते २० डिसेंबर २०२३ या कालावधीत ही पाहणी भारतासह अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, इंग्लंड, जपान, मेक्सिको या देशांमध्ये करण्यात आली.

nआठ देशांमध्ये ऑनलाइन पद्धतीने केलेल्या या सर्वेक्षणात ६,७०० हून अधिक लोकांनी सहभाग घेतला. यासाठी काही प्रश्न देण्यात आले होते.  

कामाच्या ठिकाणी काय हवे?

८०% भारतीयांनी काम करतानाही मानसिक स्वास्थ्य चांगले राहावे, असे सांगितले.

६७% जणांना काम आणि व्यक्तिगत आयुष्य यात संतुलन ठेवायला हवे. 

Web Title: Is a healthy body more important than financial planning?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.