ममता बॅनर्जींनी केलेला माईक बंद केल्याचा आरोप खोटा? PIB ने पुरावा दाखवत केला असा दावा  

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2024 04:07 PM2024-07-27T16:07:13+5:302024-07-27T16:24:30+5:30

Mamata Banerjee News: नीती आयोगाच्या बैठकी आपल्याला बोलू दिले नाही. माईक बंद करण्यात आला असा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला होता. दरम्यान, आता ममता बॅनर्जी यांनी केलेल्या आरोपांबाबत दुसरी बाजू समोर आणत पीआयबीने वेगळाच दावा केला आहे.

Is Mamata Banerjee's allegation of turning off the mic false? PIB claimed that   | ममता बॅनर्जींनी केलेला माईक बंद केल्याचा आरोप खोटा? PIB ने पुरावा दाखवत केला असा दावा  

ममता बॅनर्जींनी केलेला माईक बंद केल्याचा आरोप खोटा? PIB ने पुरावा दाखवत केला असा दावा  

नीती आयोगाच्या बैठकी आपल्याला बोलू दिले नाही. माईक बंद करण्यात आला असा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला होता. दरम्यान, आता ममता बॅनर्जी यांनी केलेल्या आरोपांबाबत दुसरी बाजू समोर आणत पीआयबीने वेगळाच दावा केला आहे. सोशल मीडिया साईट एक्स वर पीआयबी फॅक्ट चेकरने यासंदर्भात एक व्हिडीओ शेअर केला असून, त्यात लिहिले आहे की, नीती आयोगाच्या  बैठकीमध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा माईक बंद करण्यात आल्याचा करण्यात आलेला आरोप चुकीचा आहे. 

तेथील घड्याळ केवळ बोलण्याची वेळ संपुष्टात आल्याचे दर्शवत होते. एवढंच नाही तर इशारा देणारी घंटाही वाजवण्यात आली नाही. केवळ बोलण्याची वेळ संपल्याचं घटाळ्याक दर्शवण्यात आलं होंत. क्रमवारीनुसार पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री दुपारी भोजनानंतर बोलणार होत्या. मात्र पश्चिम बंगाल सरकारकडून करण्यात आलेल्या अधिकृत विनंतीनंतर त्यांना बोलण्यासाठी सातवा क्रमांक देण्यात आला. ममता बॅनर्जी यांना वेळेआधीच बैठकीतून माघारी जायचे होते. त्यामुळे हा बदल करण्यात आला होता. 

It is being claimed that the microphone of CM, West Bengal was switched off during the 9th Governing Council Meeting of NITI Aayog#PIBFactCheck

▶️ This claim is #Misleading

▶️ The clock only showed that her speaking time was over. Even the bell was not rung to mark it pic.twitter.com/P4N3oSOhBk— PIB Fact Check (@PIBFactCheck) July 27, 2024

दरम्यान, पश्चिम बंगालला निधी देण्याबाबत बोलण्यास सुरुवात केल्यावर आपला माईक बंद करण्यात आला, असा आरोप करत ममता बॅनर्जी नीती आयोगाच्या बैठकीतून बाहेर पडल्या होत्या. याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना ममता बॅनर्जी यांनी सांगितले की, जेव्हा मी अर्थसंकल्पामध्ये पश्चिम बंगालसोबत होत असलेल्या भेदभावाबाबत बोलण्यास सुरुवात केली आणि राज्यासाठी निधीची मागणी केली तेव्हा मला बोलण्यापासून रोखण्यात आलं. 

Web Title: Is Mamata Banerjee's allegation of turning off the mic false? PIB claimed that  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.