इशरत जहाँ प्रकरण : महत्त्वाची कागदपत्रे कशी हरवली?
By admin | Published: June 1, 2016 04:37 AM2016-06-01T04:37:52+5:302016-06-01T04:37:52+5:30
इशरत जहाँ चकमकीसंदर्भातील महत्वाची कागदपत्रे कशी हरवली, असा सवाल करत हरवलेल्या कागदपत्रांचा फायदा आरोप करणाऱ्यांनाच होणार आहे.
मुंबई : इशरत जहाँ चकमकीसंदर्भातील महत्वाची कागदपत्रे कशी हरवली, असा सवाल करत हरवलेल्या कागदपत्रांचा फायदा आरोप करणाऱ्यांनाच होणार आहे. त्यामुळे यामागचे गुढ समोर यावे, अशी मागणी माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी पत्रकार परिषदेत केली.
इशरत जहाँ केस संदर्भात आपण नवीन प्रतिज्ञापत्र नव्हे, तर मागणी केल्यानंतर अतिरिक्त प्रतिज्ञापत्र दिले असल्याचा खुलासाही चिदंबरम यांनी केला. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे ठोस कारण असेल त्यामुळेच त्यांनी त्यांचे जावई रॉबर्ट वड्रा यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत बाजू घेतली, असे त्यांनी सांगितले. जीएसटीबाबत कांग्रेस पक्षाचे ३ आरोप आहेत. याबाबत मोदी सरकारने आमच्या आक्षेपांचे निराकरण केले पाहिजे, असेही चिदंबरम यांनी सांगितले. खडसे यांच्या विरुद्ध झालेले आरोप पाहता त्यांनी मंत्रिमंडळातून राजीनामा देऊन बाहेर पडले पाहिजे. अन्यथा, त्यांची पाठराखण करणाऱ्यांना अधिवेशनात प्रकरण अंगलट येऊ शकते, असा सूचक इशारा काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि विधान परिषद निवडणुकीतील उमेदवार नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत दिला. (विशेष प्रतिनिधी)