उत्तर प्रदेशमधून आयएसआय एजंटला अटक
By admin | Published: May 3, 2017 08:20 PM2017-05-03T20:20:26+5:302017-05-03T20:38:07+5:30
उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाने फैजाबाद येथून पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआयच्या एजंटला अटक केली.
Next
ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 3 - उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथक आणि राज्यातील गुप्तचर यंत्रणा आणि लष्कराच्या यंत्रणांनी संयुक्त कारवाईकरून फैजाबाद येथून पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआयच्या एजंटला अटक केली. याशिवाय एका संशयितालाही ताब्यात घेण्यात आलं आहे. आफताब अली असं त्याचं नाव असून तो फैजाबादमधील ख्वासपुरा येथील रहिवासी आहे.
आफताब अली याने आयएसआयकडून हेरगिरीचे प्रशिक्षण घेतल्याचं वृत्त असून तो पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यांच्या संपर्कात होता अशी माहिती आहे. आफताबला कोर्टात हजर करण्यात येणार असून त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल. तसेच यापुढील काळात आणखी काही संशयितांना अटक होण्याची शक्यता आहे. दहशतवादविरोधी पथक आणि राज्यातील गुप्तचर यंत्रणा आणि लष्कराच्या यंत्रणांनी संयुक्त कारवाईकरून त्याला आज अटक केली.
तो पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यांच्या संपर्कात होता आणि खोट्या नावाने त्यांच्याशी संपर्क साधत होता, अशी माहिती समोर आहे. आफताब अली पाकिस्तानचा व्हिसा मिळवण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, अनेकदा त्याचा अर्ज फेटाळून लावला होता. त्याने आयएसआयसाठी काम करणार असल्याचे सांगितल्यानंतर त्याला व्हिसा मिळाला होता, असे एटीएसच्या सूत्रांनी सांगितले.