काश्मिरात हल्ल्याचा आयएसआयचा कट, पाकव्याप्त काश्मीरमधून घुसखोरीचे मार्ग
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2021 10:04 AM2021-08-03T10:04:02+5:302021-08-03T10:05:37+5:30
ISI plot to attack Kashmir: १५ ऑगस्ट रोजी असलेल्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर काश्मीरमध्ये हल्ले चढविण्याचा कट पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआयने आखला आहे.
श्रीनगर : १५ ऑगस्ट रोजी असलेल्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर काश्मीरमध्ये हल्ले चढविण्याचा कट पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआयने आखला आहे. त्याकरिता पाकव्याप्त काश्मीरमधून (पीओके) भारतीय हद्दीत दहशतवाद्यांची घुसखोरी वाढविण्यासाठी आयएसआयने जय्यत तयारी केली आहे. घुसखोरीसाठी नवे आठ मार्गही या संघटनेने निश्चित केले आहेत.
आयएसआयने पाकव्याप्त काश्मीरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेलगत २७ नवीन दहशतवादी तळ स्थापन केले आहेत. त्या ठिकाणी जूनपासून १४६ दहशतवादी आहेत. दहशतवादी हल्ले हाणून पाडण्यासाठी भारतीय लष्करही सज्ज आहे.
कोणते आहेत मार्ग?
- नली (पीओके- पाकव्याप्त काश्मीर) ते महादेव गॅप ते माजोत ते दंडेसर जंगलाद्वारे काश्मीर
- कोटकोटेरा (पीओके) ते ब्राल गली ते बागला ते कालाकोटद्वारे काश्मीर
- निकैल (पीओके) ते कोंगा गली ते दाडोत ते मांजोटेद्वारा काश्मीर
- बंटाल गाव (पीओके) ते कास नाला ते काश्मीर
- गोई (पीओके) ते सोने गली ते नांदेरी ते गुरसेन सूनरकोटद्वारा काश्मीर
- तारकुंडी (पीओके) ते कांडी ते बुधहालद्वारा काश्मीर
- दाबासी (पीओके) झिंका गली ते हरनी जंगल ते सूरनकोटद्वारा काश्मीर
- कुईरेत्ता (पीओके) ते मोहरा गॅपद्वारा काश्मीर