ISIS कनेक्शन? NIAकडून गँगस्टर 'हाफिज'ला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 05:22 PM2018-12-26T17:22:37+5:302018-12-26T17:25:34+5:30
आयसिस(ISIS) या दहशतवादी संघटनेचा राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) मोठा कट उधळला आहे.
नवी दिल्ली : आयसिस(ISIS) या दहशतवादी संघटनेचा राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) मोठा कट उधळला आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने दिल्ली आणि उत्तर प्रदेशातील एकूण 17 ठिकाणांवर छापेमारी करत आयसिसच्या नवीन मॉड्युल 'हरकत उल हर्ब ए इस्लाम' या संघटनेचा पर्दाफाश केला आहे.
याप्रकरणी उत्तर प्रदेशच्या अमरोहा येथून पाच संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. यामध्ये सोहेल उर्फ हाफिज नावाच्या एका युवकाचा समावेश आहे. हाफिज या मॉड्युलचा कथित गँगस्टर असल्याचे सांगण्यात येत आहे. राष्ट्रीय तपास संस्थेच्या माहितीनुसार, 'हरकत उल हर्ब ए इस्लाम' संघटनेशी निगडीत सर्व सदस्य सोशल मीडियाच्या माध्यातून संपर्कात आले होते.
#WATCH NIA conducts a raid in Delhi's Jafrabad area in connection with a new ISIS module styled as 'Harkat ul Harb e Islam' . pic.twitter.com/GL1GjOa1tq
— ANI (@ANI) December 26, 2018
अमरोहा येथून अटक करण्यात आलेल्या हाफिजच्या वडिलांना दिलेल्या माहितीनुसार, सकाळी साडे चार वाजताच्या सुमारास साध्या वेशात जवळपास सहा लोक त्यांच्या घरी आले. त्यानंतर घराची झडती घेतली. मात्र, याठिकाणी त्यांना काही मिळाले नाही.
Correction: NIA conducted a raid in Delhi's Jafrabad near Seelampur area in connection with a new ISIS module styled as 'Harkat ul Harb e Islam' earlier today and not in Zafarabad, in Jaunpur district, as reported earlier. https://t.co/qpL2oX53HH
— ANI UP (@ANINewsUP) December 26, 2018
दरम्यान, राष्ट्रीय तपास संस्था, दिल्ली पोलीस आणि उत्तर प्रदेश एटीएस यांनी संयुक्तरित्या केलेल्या कारवाईदरम्यान बुधवारी एकूण 17 ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली. याप्रकरणी उत्तर प्रदेशातील अमरोहा येथून 5 संशयितांनाही ताब्यात घेण्यात आले. उत्तर प्रदेशातील अमरोहा, दिल्लीतील जाफराबाद येथील ठिकाणांवर छापा मारण्यात आला. या प्रकरणात आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दिल्लीसह RSS कार्यालयावर हल्ल्याचा ISISचा होता कट https://t.co/f12n7e8MIc#ISIS
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) December 26, 2018
Visuals from Amroha where NIA is conducting searches in connection with a new ISIS module styled as 'Harkat ul Harb e Islam'. Searches are underway at 16 locations in Uttar Pradesh and Delhi. pic.twitter.com/aCp03AYRr6
— ANI UP (@ANINewsUP) December 26, 2018
NIA: Conducting searches at 16 locations in Uttar Pradesh and Delhi in connection with a new ISIS module styled as 'Harkat ul Harb e Islam' pic.twitter.com/FAFvzwwzMf
— ANI (@ANI) December 26, 2018