काश्मिरात इसिसचा ध्वज; लष्कर सतर्क

By Admin | Published: October 10, 2014 03:26 AM2014-10-10T03:26:59+5:302014-10-10T03:26:59+5:30

काश्मिरात रॅलीच्या वेळी जवानांवर झालेली दगडफेक आणि इस्लामिक स्टेटचा (आयएस) ध्वज दिसण्याची घटना लष्कराने गांभीर्याने घेतली असून तेथील परिस्थितीवर बारीक नजर ठेवली जात आहे.

ISIS flag in Kashmir; Military alert | काश्मिरात इसिसचा ध्वज; लष्कर सतर्क

काश्मिरात इसिसचा ध्वज; लष्कर सतर्क

googlenewsNext

श्रीनगर : काश्मिरात रॅलीच्या वेळी जवानांवर झालेली दगडफेक आणि इस्लामिक स्टेटचा (आयएस) ध्वज दिसण्याची घटना लष्कराने गांभीर्याने घेतली असून तेथील परिस्थितीवर बारीक नजर ठेवली जात आहे. आयएसचा ध्वज आढळून येणे ही सर्व सुरक्षा संस्थांसाठी गंभीर चिंतेची बाब असल्याचे लष्कराच्या १५ व्या कॉर्प्सचे जनरल आॅफिसर कमांडिंग (जीओसी) लेफ्ट. जन. सुब्रता साहा यांनी स्पष्ट केले.
काश्मिरात सुरक्षा यंत्रणेची चिंता वाढवणाऱ्या काही घटना घडल्या आहेत. लष्कराच्या जवानांवर दगडफेक होणे आणि आयएसचा ध्वज आढळणे या बाबींबाबत माहिती मागितली असून परिस्थितीवर नजर ठेवली जात असल्याचे त्यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)
गेल्या महिन्यात काश्मीरमध्ये पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सेवेत असलेल्या हेलिकॉप्टर्सवर लोकांनी दगडफेक केली होती. लोकांमध्ये असलेली संतापाची भावना त्यामागे होती. अशा घटना अपवादात्मक ठरतात. लोक पुरामुळे चिंतित होते. पैसा,औषध, मुलांचे शिक्षण आणि उदरनिर्वाहाचा प्रश्न या सर्वांमुळे काश्मिरी लोकांमध्ये अनिश्तिततेचे वातावरण होते. अशा परिस्थितीत अशा घटनांवर अतिशय दक्षपणे नियंत्रण मिळविले जाते. या घटना अपवादात्मक होत्या आणि परिस्थितीनुसार आम्ही निर्णय घेतला आहे, असे त्यांनी सांगितले.
पूरग्रस्तांच्या मदतकार्यात
अतिरेक्यांची मदत नाही
दक्षिण काश्मिरात पुराच्या वेळी अतिरेक्यांनी मदतकार्यात सहभाग घेतल्याचे वृत्त ले. जन. साहा यांनी फेटाळले. ‘सैलाबसे सलामती’ असे या परिस्थितीला संबोधू या. पर्यटन आणि निवडणुकीसाठी परिस्थिती पूर्ववत होणे महत्त्वाचे आहे. काही भागात लोकांची घरे नव्याने बांधावी लागणार असून त्या लोकांना मदतीची गरज आहे. हिवाळा जवळ येत असल्यामुळे आम्हाला सज्ज राहावे लागेल. युवकांची सकारात्मक मदत घेतली जात आहे. काश्मिरात पर्यटन महत्त्वाचे आहे, कारण त्याचा संबंध लोकांच्या उदरनिर्वाहाशी येतो. आम्ही जनतेच्या सहभागातून तेथे काम करीत आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: ISIS flag in Kashmir; Military alert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.