कंदाहार विमान अपहरणात ISI चा हात, डोवाल यांचा खुलासा

By admin | Published: January 15, 2017 03:17 PM2017-01-15T15:17:54+5:302017-01-15T16:46:55+5:30

"आम्ही जेव्हा विमानाजवळ पोहोचलो त्यावेळी विमानाच्या आजू-बाजूला खूप तालिबानी दहशतवादी होते आणि त्यांच्याकडे शस्त्रास्त्रं होती"

ISI's hand, Dowl disclosed Kandahar plane abduction | कंदाहार विमान अपहरणात ISI चा हात, डोवाल यांचा खुलासा

कंदाहार विमान अपहरणात ISI चा हात, डोवाल यांचा खुलासा

Next

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 15 - 24 डिसेंबर 1999 रोजी पाच शस्त्रधारी दहशतवाद्यांनी 178 प्रवाशांसह इंडियन एअरलाइन्सचे आयसी-814 विमानाचे अपहरण केले होते. याप्रकरणी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी मोठा खुलासा केला आहे. पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयचा कंदाहार विमान अपहरणामध्ये सहभाग होता असा खुलासा त्यांनी केला आहे.

वृत्तसंस्था रॉयटर्सचे भारतातील माजी ब्‍यूरो चीफ मायरा मॅकडॉनल्‍ड यांनी कंदाहार प्रकरणावर 'डिफीट इज अ‍ॅन ऑर्फन: हाऊ पाकिस्‍तान लॉस्‍ट द ग्रेट साउथ एशियन वॉर' हे पुस्तक लिहिलं आहे. यामध्येच डोवाल यांनी आयएसआयच्या सहभागाबाबत माहिती दिली आहे. या अपहरणामध्ये ओलीस ठेवलेल्यांना सोडवण्यासाठी चर्चा करणा-यांमध्ये डोवाल यांचा समावेश होता. या पुस्तकात डोवाल यांचा एक इंटरव्यू छापण्यात आला आहे. 

या इंटरव्यूमध्ये डोवाल म्हणतात, ''अपहरणकर्त्यांना जर आयएसआयचं समर्थन नसतं तर हे संकट लवकर संपलं असतं . आम्ही जेव्हा विमानाजवळ पोहोचलो त्यावेळी विमानाच्या आजु-बाजूला खूप तालिबानी दहशतवादी होते आणि त्यांच्याकडे शस्त्रास्त्रं होती. दहशतवादयांशी चर्चा करण्यास टीम पोहोचली त्यावेळी या प्रकरणात आयएसआयचा सहभाग असल्याचं आमच्या लक्ष्यात आलं. विमानाजवळ आयएसआयचे दोन जणं उभे होते. त्यापैकी एक लेफ्टिनेंट कर्नल तर दूसरा मेजर होता. अपहरणकर्ते थेट आयएसआयच्या अधिका-यांशी चर्चा करत असल्याचं कळल्यावर परिस्थिती आणखी बिघडली. तेथे जे काही घडत होतं त्याची माहिती आयएसआयला मिळत होती. जर अपहरणकर्त्यांना आयएसआयने पाठिंबा दिला नसता तर ते संकट आम्ही लवकर संपवलं असतं. अपहरणकर्त्यांवर आम्ही जो काही दबाव निर्माण केला होता आयएसआयने तो दबाव संपवला''.

त्यावेळी 178 प्रवाशांच्या सुरक्षित सुटकेच्या बदल्यात दहशतवाद्यांनी मौलाना मसूद अझहरसह, अहमद उमर सईद शेख आणि मुस्‍ताक जरगार या 3 दहशतवाद्यांच्या सुटकेची अटक घातली होती. या दहशतवाद्यांना सोडवण्‍यासाठी भारतातून विशेष विमान पाठवले गेले होते.

Web Title: ISI's hand, Dowl disclosed Kandahar plane abduction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.