ISISच्या संशयित दहशतवाद्याची पत्नी म्हणाली, 'मेरे छोटे बच्चे हैं, मैं कहां जाऊंगी?'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2020 03:26 PM2020-08-23T15:26:49+5:302020-08-23T15:28:51+5:30

बलरामपूरमधील अबू युसूफच्या घरातून मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त करण्यात आली आहेत.

Isis Terrorist Abu Yusuf Wife Says I Wish He Could Be Forgiven | ISISच्या संशयित दहशतवाद्याची पत्नी म्हणाली, 'मेरे छोटे बच्चे हैं, मैं कहां जाऊंगी?'

ISISच्या संशयित दहशतवाद्याची पत्नी म्हणाली, 'मेरे छोटे बच्चे हैं, मैं कहां जाऊंगी?'

googlenewsNext
ठळक मुद्देअबू युसूफच्या वडिलांनी मुलाच्या या कृत्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. अबु युसूफ असे अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याचे नाव आहे.

बलरामपूर : दिल्लीतील धौलाकुआं येथे अटक करण्यात आलेल्या ISIS च्या संशयित दहशतवादाच्या कुटुंबीयांनी त्याच्या कृत्याबद्दल खेद व्यक्त केला आहे. अबु युसूफ असे अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याचे नाव आहे.

जर आपल्याला आधीच त्याच्या या कृत्याबद्दल माहिती असती, तर आम्ही त्याच्यापासून वेगळे राहिलो असतो, असे अबु युसूफच्या वडिलांनी सांगितले. याशिवाय, अबु युसूफने घरी स्फोटके गोळा केली होती. यासाठी त्याला विरोध केला, पण त्याने ऐकले नाही, असे त्याच्या पत्नीने सांगितले.

अबु युसूफची पत्नी म्हणाली, "त्याने घरी स्फोटके आणि इतर वस्तू गोळा केल्या होत्या. ज्यावेळी मी त्याला हे सर्व करु नका, असे सांगितले. त्यावेळी मला थांबवू नको असे, त्याने म्हटले. माझी अशी इच्छा आहे की त्याला एकदा माफ केले जावे. मला चार मुलं आहेत, मी कुठे जाणार?"

अबू युसूफच्या वडिलांनी मुलाच्या या कृत्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, 'मला खंत वाटते की तो अशा प्रकारच्या कार्यात सहभागी होता. त्याने चुकीचे काम केले आहे, पण त्याला एकदा माफ करावे, अशी माझी इच्छा आहे. मला त्याच्या कारवायांबद्दल माहिती असते तर मी त्याला कायमचे सोडून जायला सांगितले असते."
 

अबू युसूफच्या घरात सापडली स्फोटके 
बलरामपूरमधील अबू युसूफच्या घरातून मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. यात एक्सप्लोसिव्ह जॅकेटदेखील आहे, जे हल्ल्यासाठी तयार केले होते. अबू युसुफ बलरामपूरचा रहिवासी आहे. त्याने आत्मघाती हल्ल्यासाठी बेल्टही तयार केल्याची स्वत: कबुली दिली आहे. त्याच्या ठिकाणांवर पोलीस आणि एटीएस छापा टाकत आहेत.

हल्ल्याची तयारी केली होती
पोलिस चौकशीत अबू युसूफने कबूल केले की त्याने आत्मघातकी हल्ल्यासाठी शरीरावर स्फोटके बांधून ठेवणारा पट्टाही तयार केला आहे, असे दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच, अबू युसूफला दिल्लीच्या खूप गर्दीच्या ठिकाणी मोठा स्फोट घडवून आणयचा होता. सोशल मीडियाच्या माध्यमातून आयएसआयएसच्या हँडलरच्या संपर्कात आला आणि 2010 पूर्वी सौदी अरेबियामध्ये कामावर गेला, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

गावात कॉस्मेटिकचे दुकान
दिल्लीच्या धौलाकुआं परिसरातून अबू युसूफच्या अटक करण्यात आली. तो मूळचा उत्तर प्रदेशातील बलरामपूर जिल्ह्यातील उतरौला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भैंसाही गावचा रहिवासी आहे. गावात त्याचे कॉस्मेटिकचे दुकान आहे. त्याचे कुटुंबीय याच गावात राहतात, अशी माहिती मिळते.
 

Web Title: Isis Terrorist Abu Yusuf Wife Says I Wish He Could Be Forgiven

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.