इस्लामिक स्टेटने अपहरण केलेल्या भारतीय शिक्षकांची सुटका
By admin | Published: September 15, 2016 02:51 PM2016-09-15T14:51:16+5:302016-09-15T14:51:16+5:30
लिबयामधून इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी अपहरण केलेल्या दोन भारतीय शिक्षकांची सोडवणूक करण्यात आली आहे. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी ही माहिती दिली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 15 - लिबयामधून इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी अपहरण केलेल्या दोन भारतीय शिक्षकांची सोडवणूक करण्यात आली आहे. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी ही माहिती दिली आहे.
जुलै 2015 मध्ये चार शिक्षकांचे अपहरण करण्यात आले होते. इस्लामिक स्टेटशी संबंधित असलेल्या लिबियातील दहशतवाद्यांनी हे अपहरण केले होते. त्यापैकी लक्ष्मीकांत रामकृष्ण व मुलबगील विजयकुमार यांची काही दिवसांतच सुटका करण्यात यश आले होते. आता एक वर्ष लोटल्यानंतर टी गोपालकृष्णन व सी बालकृष्णन या दोघांचीही सुटका करण्यात आली आहे.
लिबयातल्या सिरते येथील विद्यापीठात हे शिक्षक विद्यादानाचे काम करत होते. भारतात परतण्याच्या तयारीत असतानाच त्यांचे अपहरण करण्यात आले होते. ऑगस्ट 2014 मध्ये लिबियात अडकलेल्या शेकडो भारतीयांची सुटका करण्यात आली होती, यामध्ये या चौघांचाही समावेश होता. परंतु, सप्टेंबरमध्ये विद्यापीठ सुरू झाल्यावर हे चारही प्राध्यापक पुन्हा गेले होते, आणि त्यावेळी त्यांचे अपहरण करण्यात आले होते.
I am happy to inform that T Gopalakrishna (AP) & C BalaramKishan (Telangana) who were captive in Libya since 29 July 2015 have been rescued.
— Sushma Swaraj (@SushmaSwaraj) September 15, 2016