हिमाचल प्रदेशात मिळाले इसिसचे धमकीचे पत्र
By admin | Published: January 31, 2017 05:42 PM2017-01-31T17:42:02+5:302017-01-31T17:55:16+5:30
हिमाचल प्रदेशमधील सलोन जिल्ह्यात आर्मी उपहारगृह जवळ इसिसचे धमकीचे पत्र मिळाले आहे. या पत्रामध्ये बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 31 - हिमाचल प्रदेशमधील सलोन जिल्ह्यात आर्मी उपाहारगृहाजवळ इसिसचे धमकीचे पत्र मिळाले आहे. या पत्रामध्ये बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. सलोनमध्ये सुबाथू कँटजवळ सार्वजनिक ठिकाणी इसिसची ही पत्रके मिळाली आहेत. यामध्ये इसिसच्या समर्थनार्थ घोषणा लिहिण्यात आल्या आहेत. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जवान आणि स्थानिक पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सलोनमध्ये सुबाथू कँटच्या पार्कमध्ये तसेच अन्य सार्वजनिक ठिकाणी इसिसची चार धमकीची पत्रे मिळाली आहेत. या धमकीच्या पत्रात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच नेपाळ यांची नावे लिहिली आहेत आणि त्याखाली बूम असे लिहिले आहे. तसेच पत्राच्या सुरुवातीला फतवा इसिस लिहिण्यात आले आहे. या पत्रासह इसिसचे फोटो, पोस्टर चिटकवलेले पोलिसांना मिळाले. त्याचप्रमाणे अनेक भिंतींवर स्प्रेच्या माध्यमातून इसिसचे नाव आणि घोषणाही पाहायला मिळाल्या.
सुरुवातीच्या तपासानंतर हा सर्व एकाद्याने केलेला बनाव असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात कलम 124 अ नुसार गुन्हा दाखल केला आहे. त्याचप्रमाणे पुढील तपासासाठी फॉरेन्सिक टीमला बोलवण्यात आले आहे.
दरम्यान, यापूर्वी हिमाचल प्रदेशमधील धरमपूरमध्येही अशाच प्रकारची इसिसची पत्रे मिळाली होती. त्यावर इथे इसिस येत असल्याचा संदेश होता. सूत्रांच्या माहितीनुसार पोलीस या दोन्ही घटनांना एकमेकांशी जोडत पुढील तपास करणार आहेत.
ISIS poster seen near Army Cantt in Himachal Pradesh's Solan district pic.twitter.com/h57UaqDxCh
— ANI (@ANI_news) January 31, 2017