एम्स व आरएमएलमध्ये आयसोलेशन वॉर्ड; कोरोना व्हायरसच्या रुग्णांसाठी प्रतिबंधात्मक उपाय
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2020 00:43 IST2020-01-27T00:43:24+5:302020-01-27T00:43:53+5:30
या विषाणूचा प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी या वॉर्डची निर्मिती करण्यात आली आहे.

एम्स व आरएमएलमध्ये आयसोलेशन वॉर्ड; कोरोना व्हायरसच्या रुग्णांसाठी प्रतिबंधात्मक उपाय
नवी दिल्ली : राजधानीतील कोरोना व्हायसरची लागण झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी शहरातील महत्त्वाचे रुग्णालय असलेल्या एम्ससह डॉ. राम मनोहर लोहिया रुग्णालयात आयसोलेशन वॉर्डची निर्मिती करण्यात आली आहे.
या विषाणूचा प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी या वॉर्डची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये आजाराशी निपटण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व सेवासुविधांचा विस्तार केला जाणार आहे.
या विषाणूमुळे मृत्यूचे प्रमाण जास्त नसणार आहे. मात्र आपण सतर्कता बाळगणे आवश्यक असल्याचे मत एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी म्हटले आहे. मात्र या विषाणूचे वेगाने होणारे संक्रमण थांबवणारे उपाय करणे आवश्यक आहे. या रोगाविषयी लोकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही असेही ते म्हणाले. कोरोना रुग्णांना हातळणाऱ्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनाही मास्क, हॅण्ड सेनिटायझर आदी सारख्या सुविधा पुरवण्यात येणार आहेत, तसेच हाताळण्यासाठी स्वतंत्र पेज तयार करण्यात आले आहे. दोन्ही रुग्णालयात आवश्यकता वाटल्यास सुविधांमध्ये वाढ केली जाईल असेही रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट
केले आहे.