इस्रायल भारताच्या पाठीशी; संरक्षणासाठी हवी ती मदत करण्याची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2019 11:42 AM2019-02-20T11:42:51+5:302019-02-20T13:15:05+5:30

पुलवामा हल्ल्यानंतर जगभरातून पाकिस्तानवर कठोर शब्दांत टीका केली जात आहे.

Israel is behind India; Acknowledgment for the need for protection | इस्रायल भारताच्या पाठीशी; संरक्षणासाठी हवी ती मदत करण्याची ग्वाही

इस्रायल भारताच्या पाठीशी; संरक्षणासाठी हवी ती मदत करण्याची ग्वाही

Next

नवी दिल्ली- पुलवामा हल्ल्यानंतर जगभरातून पाकिस्तानवर कठोर शब्दांत टीका केली जात आहे. त्यानंतर भारतानंही पाकिस्तानविरोधात कूटनीतीचा वापर करण्यास अवलंब केला आहे. भारतावर पाकिस्तान पुरस्कृत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर इस्रायलनं भारताला खुलं समर्थन दिलं आहे. दहशतवादाविरोधातल्या भारताबरोबरच्या लढाईत आम्ही कोणतीही मर्यादा पाळणार नाही. भारताला या लढ्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल, असं इस्रायलनं स्पष्ट केलं आहे.

भारताला मदतीसाठी कोणतीही अट ठेवणार नाही. दहशतवादाविरोधात लढण्यासाठी भारताला विनाअट लागेल तशी मदत करण्याची ग्वाही इस्रायलनं दिली आहे. आम्ही तुम्हाला मदत करताना कोणतीही मर्यादा पाळणार नाही. विशेष म्हणजे दहशतवादी हल्ल्यांविरोधातील लढ्यासाठी इस्रायल पद्धतीचा वापर करण्याची मागणी जोर धरत असताना इस्रायलनं दिलेल्या पाठिंब्याला महत्त्व प्राप्त झालं आहे. 

इस्रायलचे भारतातील राजदूत डॉ. रॉन माल्का यांनी ही माहिती दिली आहे. दहशतवादाची समस्या झेलत असलेल्या भारताला इस्रायल काय मदत करणार असा प्रश्न डॉ. माल्का यांना विचारला असता त्यांनी भारताला अमर्याद मदत करायला तयार असल्याचं सांगितलं. आम्ही भारतासारख्या आमच्या खच्च्या आणि जवळच्या मित्राला कोणत्याही प्रकारची मदत करण्यासाठी सज्ज आहोत. दहशतवाद ही भारत आणि इस्रायलपुरती मर्यादित समस्या नसून जगभरात तिचा उपद्रव आहे. त्यामुळेच दहशतवादाविरोधात आम्ही आमच्या सच्च्या मित्राला इस्रायली युद्धतंत्र देऊ, असंही डॉ. माल्का म्हणाले आहेत. इस्रायलचे अध्यक्ष नेतान्याहू यांनी भारताला हरतऱ्हेचे सहकार्य करण्याची सूचना केल्याचा उल्लेखही डॉ. माल्का यांनी केला आहे. 

Web Title: Israel is behind India; Acknowledgment for the need for protection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.